Government Employees DA Hike : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून तीन टक्के एवढा वाढेल अशा चर्चा रंगल्या आहेत. अर्थातच सध्या मिळत असलेल्या बेचाळीस टक्के महागाई भत्त्यात आणखी तीन टक्के वाढ होणार आहे.
म्हणजेच महागाई भत्ता हा 45 टक्के एवढा होणार आहे. महागाई भत्ता वाढ म्हणजेच डीए वाढ वर्षातून दोनदा केली जाते. पहिली वाढ जानेवारी महिन्यापासून आणि दुसरी जुलै महिन्यापासून लागू केली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या महागाई भत्ता वाढीची घोषणा पुढल्या महिन्यात होणार आहे.
अशातच मात्र काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील बँकेच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय झाला आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांचा DA दोन टक्के एवढा वाढवण्यात आला आहे.
बँकेतील कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात झालेल्या करारानुसार वाढ केली जाते. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच बँकेतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसाठी देखील लेबर ब्युरो ऑफ इंडियाने जारी केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांक क्रमांकाचा आधार घेतला जातो.
दरम्यान आता याच निर्देशांकाच्या आधारावर बँकेतील सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट ते ऑक्टोबर 2023 या कालावधीसाठी महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशातील सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना सध्याच्या ५९६ डीए स्लॅबच्या तुलनेत ६३२ डीए स्लॅब दिला जाणार आहे.
म्हणजे यामध्ये एकूण ३६ डीए स्लॅबची मोठी वाढ यावेळी करण्यात आली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर ४४.२४ टक्के झाला आहे. याआधी मे ते जुलै २०२३ पर्यंत हा महागाई भत्ता दर ४१.७२ टक्के एवढा होता.
म्हणजे या संबंधित बँकेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकूण २.५२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. निश्चितच सरकारने घेतलेला हा निर्णय या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर राहणार आहे.