Government Investment Scheme : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. भारतात अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही.
तथापि, आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे कमी परतावा मिळाला तरी चालेल मात्र सुरक्षित योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशा गुंतवणूकदारांसाठी सरकारी बचत योजनाखूपच उपयोगी येतात. या बचत योजनांमध्ये गुंतवणूकदाराला थोडा कमी परतावा मिळू शकतो मात्र सुरक्षा 100% असते.
दरम्यान आज आपण अशा काही सरकारी बचत योजनांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये गुंतवणूकदारांना चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
Bank FD : बँक एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7.75 टक्क्यांपर्यंतचे व्याजदर मिळू शकते. एचडीएफसी या देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेच्या माध्यमातून FD साठी 7.75 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर केले जात आहे. दुसरीकडे एसबीआय कडून 7.50 टक्क्यांपर्यंतचे व्याजदर दिले जात आहे.
बचत खाते : पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेत बचत खाते अर्थातच सेविंग अकाउंट ओपन केल्यास अन यामध्ये पैसे ठेवल्यास ग्राहकांना ४ टक्के एवढे व्याज मिळते.
पोस्ट ऑफिस FD स्कीम : 1 वर्ष पोस्ट ऑफिस एफडी : 6.9 टक्के, 2 वर्षांसाठी पोस्ट ऑफिस एफडी : 7.0 टक्के, 3 वर्ष पोस्ट ऑफिस एफडी : 7 टक्के, 5 वर्ष पोस्ट ऑफिस FD : 7.5 टक्के
पोस्ट ऑफिस आरडी योजना : पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेतून पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक करत आहे. 5 वर्षे आरडी योजनेत 6.5 टक्के एवढे व्याज ऑफर केले जाते. विशेष म्हणजे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणखी पाच वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेला एक्सटेंड केले जाऊ शकते. येथे गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याज याचा फायदा मिळतो.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) : या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.7 टक्के पर्यंतचे व्याजदर मिळते.
किसान विकास पत्र : 7.5 टक्के (115 महिन्यांत प्रौढ)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी : 7.1 टक्के
सुकन्या समृद्धी खाते (सुकन्या समृद्धी योजना): ८.२ टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ८.२ टक्के
मासिक उत्पन्न योजना : पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना किंवा मंथली इन्कम स्कीम ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. यात गुंतवणूक केल्यास 7.4 टक्केएवढे व्याज मिळू शकते.