हामून चक्रीवादळ : तीव्रता वाढली, देशातील ‘या’ 7 राज्यात मुसळधार वादळी पाऊस पडणार, केव्हा संपणार चक्रीवादळ ? IMD चा नवीन अंदाज काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hamoon Cyclone : बंगालच्या खाडीत तयार झालेल्या हामून चक्रीवादळाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. खरतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवस तापमानातील ही वाढ कायम राहणार आहे. यानंतर देशात थंडीला सुरुवात होणार असा अंदाज आहे.

अशातच मात्र बंगालच्या उपसागरात एका चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. याला हमून असे नाव देण्यात आले असून या चक्रीवादळाची आता मोठ्या प्रमाणात तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा परिणाम होणार की नाही याबाबत देखील हवामान खात्याने महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार हामून चक्रीवादळामुळे देशातील एकूण 7 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठं पडणार मुसळधार वादळी पाऊस ?

IMD ने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार Hamoon Cyclone मुळे मणिपूर, मिझोराम, आसाम, मेघालय, त्रिपुरा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या ईशान्येकडील सात राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सात पैकी ओडिसा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्याला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

विशेषता या दोन राज्यातील किनारपट्टींवर या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. चक्रीवादळामुळे या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहतील आणि जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. या वादळाचा फटका बांगलादेशच्या किनारी भागाला देखील बसणार आहे.

या वादळामुळे 50 ते 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वाऱ्याचा हा वेग 70 किलोमीटर प्रतितास देखील होऊ शकतो असे सांगितले जात आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा वेग 25 ऑक्टोबर रोजी अर्थातच आज सायंकाळपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

आज संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ संपण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. यामुळे हामून चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत शमणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महाराष्ट्रवर काय परिणाम होणार ? 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा परिणाम फक्त ईशान्यकडील राज्यांवर पाहायला मिळणार आहे. याचा परिणाम आपल्या महाराष्ट्र राज्यावर होणार नाही. महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. 

Leave a Comment