Harbhara Bajarbhav : दिवाळीपूर्वी दबावत असलेले कापूस, सोयाबीन बाजारभाव पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. दिवाळीच्या आधी कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नव्हता.
राज्यातील बहुतांशी बाजारात कापूस आणि सोयाबीन हमीभावाच्या आसपास विकले जात होते. काही ठिकाणी तर हमीभावापेक्षा कमी दर मिळत होता. मात्र आता राज्यातील बहुतांशी बाजारात सोयाबीन आणि कापसाचे बाजार भाव हमीभावापेक्षा अधिक झाले आहेत.
सोबतच कांद्याचे देखील भाव दिवाळीनंतर बऱ्यापैकी वधारले आहेत. काल सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याला कमाल 5,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे.
इतरही बाजारातकाल कांद्याला सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल ते साडे चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे. विशेष म्हणजे आता हरभऱ्याच्या दरातही वाढ होऊ लागली आहे.
खर तर दिवाळीच्या काळात राज्यातील बहुतांशी बाजार समित्या बंद होत्या. परंतु दिवाळी पाडवाचा सण साजरा झाल्यानंतर राज्यातील बाजार समित्या पुन्हा एकदा पूर्ववत सुरु झाल्या आहेत.
बाजार समित्या सुरू झाल्यानंतर हरभरा दरात आता तेजी आली आहे. आवक मंदावल्याने बाजारभावात वाढ होत असल्याचे मत बाजार अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सध्या शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडे हरभऱ्याचा खूपच कमी माल उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यावर्षी आत्तापर्यंत झालेल्या पेरणीत हरभरा लागवडीमध्ये घट नमूद करण्यात आली आहे.
लागवड कमी झाली असल्याने साहजिकच यंदा उत्पादन कमी राहणार आहे. हेच कारण आहे की, सध्या बाजारात हरभरा दरामध्ये मोठी तेजी आली आहे.
या चालू आठवड्यात महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा दरात 150 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे.
पणन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या चालू आठवड्यात राज्यातील सोलापूर एपीएमसी मध्ये हरभऱ्याला पाच हजार सहाशे ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला, अकोला एपीएमसी मध्ये सहा हजार दोनशे ते सहा हजार 250, लातूर एपीएमसी मध्ये सहा हजार ते सहा हजार 100, नागपूर एपीएमसी मध्ये सहा हजार 150 ते सहा हजार दोनशे, उदगीर एपीएमसी मध्ये 5900 ते 6100, अहमदनगर एपीएमसी मध्ये सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.