Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाला असून अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिके अंतिम टप्प्यात आली आहेत.
येत्या काही दिवसात गहू आणि हरभरा काढणीसाठी तयार होणार आहे. अशातच आता राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला जाणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे. खरे तर गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे खरीप हंगामातून अपेक्षित अशी कमाई झालेली नाही.
यामुळे शेतकरी बांधव आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण मला रब्बी हंगामावर आहे. पण, रब्बी हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने पावसाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात, या चालू वर्षी जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. दरम्यान आता पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या शेवटी पर्यंत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दुसरीकडे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रातील किमान तापमान वाढलेले आहे.
राज्यातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील थंडीचा जोर काहीसा कमी होणार आहे.