Havaman Andaj : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ, चक्रीवादळ, जास्तीची उष्णता अशा विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर गारपीट सुद्धा झाली आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा मात्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांनी बहू कष्टाने जोपासलेले शेतीपीक या अवकाळी पावसामुळे पूर्णता वाया गेले आहे. काही ठिकाणी गारपीट झाली असल्याने याचा फळ पिकांवर देखील मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आधीच बेजार झालेला शेतकरी राजा आता पूर्णपणे हतबल झाला आहे. यामुळे आता अनेकांच्या माध्यमातून अवकाळी पावसाचे सावट कधी थांबणार, वादळी पाऊस कधी विश्रांती घेणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय.
दरम्यान याच संदर्भात भारतीय हवामान खात्याने एक मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
आय एम डी ने आज राज्यातील मुंबई सह उत्तर कोकणातील आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज दिला आहे.
दुसरीकडे आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचे संगितले गेले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज देण्यात आला आहे तेथील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
तसेच ज्या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकारांनी केले आहे. आय एम डी म्हटल्याप्रमाणे आगामी चार ते पाच दिवस महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू राहणार आहे.
त्यानंतर मात्र वादळी पावसाचा जोर कमी होऊ शकतो असा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
आज देखील राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज विदर्भातील काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असे देखील बोलले जात आहे.