मोठी बातमी ! महाराष्ट्रातील कोणार्क सहकारी बँकेनंतर आता RBI ने ‘या’ बड्या बँकेवर लावलेत कठोर निर्बंध, आता ग्राहकांना….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kotak Mahindra Bank RBI : आरबीआयने नुकताच महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कठोर निर्बंध लादले आहेत. यामुळे सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरेतर गेल्या काही महिन्यांमध्ये मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँकेने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

काही बँकांवर कठोर निर्बंध लावले गेले आहे. विशेष म्हणजे काही बँकांचे लायसन्स अर्थातच परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत. आरबीआयने एसबीआय, एचडीएफसी यांसारख्या बँकांवर सुद्धा दंडात्मक कारवाई केली आहे.

अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. RBI ने पुन्हा एकदा देशातील एका बड्या बँकेवर कठोर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देशातील कोटक महिंद्रा या बड्या प्रायव्हेट बँकेवर आरबीआयने कठोर कारवाई केली आहे.यामुळे कोटक महिंद्रा बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अशा परिस्थितीत आज आपण आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर काय कारवाई केली आहे, मध्यवर्ती बँकेने या प्रायव्हेट बँकेवर कोणते निर्बंध लावले आहेत आणि याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

RBI ने काय कारवाई केली आहे?

आरबीआयने या बँकेच्या ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगवर बंदी घालण्यात आली आहे. दोन वर्षे या प्रायव्हेट बँकेच्या माहिती तंत्रज्ञान जोखीम परीक्षणात गंभीर त्रुटी आढळून आली असल्याने आरबीआयने ही कठोर कारवाई केली आहे.

ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेला आपल्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यास व नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास मनाई केली आहे.

सध्याच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे आरबीआयच्या या कारवाईनंतर विद्यमान ग्राहकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण की, या निर्बंधाचा विद्यमान ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाहीये.

आतापर्यंत कोटकने जेवढ्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड दिले आहे त्या ग्राहकांसह विद्यमान सर्व ग्राहकांसाठी बँकिंग सेवा आधीसारख्याच सुरू राहणार आहेत. ज्यावेळी कोटक आरबीआयला आढळलेल्या त्रुटी दूर करेल त्यावेळी हे निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात असे म्हटले जात आहे.

Leave a Comment