Havaman Andaj : येत्या सात ते आठ दिवसात डिसेंबर महिना संपेल. यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र आता डिसेंबर महिना संपत आला असतानाही देशातील विविध भागांमध्ये पावसाचे थैमान सुरूच आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून राज्यासह संपूर्ण देशात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते.
यंदा मात्र कडाक्याच्या थंडीला डिसेंबरचा महिना उजाडला आहे. सध्या देशातील काही भागांमध्ये जोरदार थंडी पडत आहे तर काही ठिकाणी अजूनही पावसाचा तांडव सुरू आहे. देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी लागत आहे.
यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळत आहे. परिणामी तेथील सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांवर या मुसळधार पावसाचा मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे.
अशातच आता भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवस देशातील कोणत्या राज्यांमध्ये पाऊस बरसणार आणि कुठे थंडीचा जोर वाढणार याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
काय म्हणतय हवामान विभाग
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरा येथे आगामी दोन दिवस दात धुक्याची चादर पसरणार आहे. यामुळे दृश्यमानता कमी होणार आहे.
परिणामी येथील नागरिकांना सकाळी सकाळी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा अपघात होण्याची शक्यता राहणार आहे.
दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. यानंतर मात्र या संबंधित भागातील तापमानात घट होणार आहे.
परिणामी तिथे थंडीची चाहूल लागणार असे बोलले जात आहे. आज आणि उद्या जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश येथे बर्फवृष्टी होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच आज पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडणार आहे.
विशेष म्हणजे उत्तर भारतातून थंड वारे आपल्या महाराष्ट्राकडे येत आहेत परिणामी आपल्या महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे. आपल्या महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.