मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित ‘असे’ झाल्यास तिला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळणार नाही ! वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property Rights : भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आली आहे.

मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती हावी असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या देशात आजही अनेक ठिकाणी मुलींना दुय्यम दर्जा मिळतो.

आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. पण तरीही आपल्या देशात महिला आणि मुलींना संपत्तीच्या बाबतीत देखील नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो.

अनेकदा मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मिळत नाही. दरम्यान, आज आपण मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत केव्हा हिस्सा मिळत नाही याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुलींना वडिलांच्या संपत्तीत हिस्सा केव्हा मिळत नाही

भारतीय उत्तराधिकारी कायद्यानुसार मुलांना आणि मुलींना वडिलांच्या नावे असलेल्या वडिलोपार्जित संपत्तीवर समान अधिकार आहेत. मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित तिला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यात आले आहेत.

मात्र, वडिलांच्या नावे असलेली संपत्ती जर वडिलांनी स्वतःच्या कष्टाने कमावलेली असेल म्हणजेच वडीलोपार्जित नसेल तर अशा संपत्तीवर मुलगी दावा सांगू शकत नाही.

अर्थातच वडील अशी संपत्ती कोणालाही देऊ शकतात. त्यांना जर अशी संपत्ती कोणाला दान करायची असेल तर ते विनापरवानगी अशी संपत्ती दान देखील करू शकतात.

मात्र जेव्हा वडिलांचा इच्छापत्र किंवा मृत्युपत्र न बनवताच मृत्यू झाला असेल तर अशावेळी अशा वडिलांच्या नावे असलेल्या स्वकष्टार्जीत संपत्तीवर देखील मुलांचा आणि मुलींचा समान अधिकार असतो.

पण जर मुलींनी हक्क सोड प्रमाणपत्र तयार करून संपत्तीवरील आपला हक्क काढून घेतला असेल तर अशावेळी अशा संपत्तीवर मुलींना पुन्हा अधिकार सांगता येत नाही. संपत्ती वडीलोपार्जित असो किंवा स्वअर्जित असो तरीदेखील हक्कसोड प्रमाणपत्रामुळे मुलीचे त्या संपत्तीवरील हक्क संपुष्टात येतात.

जर मुलीने स्वेच्छेने वडिलांची संपत्ती सोडली, याची रिलीझ डीड ज्याला महाराष्ट्रात हक्क सोड प्रमाणपत्र म्हणून ओळखले जाते ते जर लिहले आणि ती रिलीझ डीड नोंदणीकृत असेल, तर मुलीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. यानंतर मुलगी आपल्या वडिलांच्या संपत्तीत कोणत्याही प्रकारचा हिस्सा मागू शकत नाही.

Leave a Comment