भारतात ऊस उत्पादनाच्या बाबतीत कोणते राज्य आहे नंबर १, महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Production : उस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची भारतातील बहुतांशी राज्यामध्ये लागवड केली जाते.

आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात ऊस पिकाची लागवड केली जाते.

जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात उसाची कमी अधिक प्रमाणात शेती होते. या पिकाच्या शेतीवर बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून ऊस उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो हा प्रश्न उपस्थित केला जात होता.

तसेच ऊस उत्पादनात कोणती राज्य अग्रेसर आहेत? याविषयी विचारणा केली जात होती. दरम्यान आज आपण या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ऊस उत्पादनाच्या बाबतीत कोणते राज्य आहे 1 नंबरी

भारतात ऊस उत्पादनाच्या बाबतीत उत्तर प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश मध्ये उसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. तेथील शेतकरी उसापासून चांगले बंपर उत्पादन मिळवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मध्ये देशाच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 44.50% एवढे उसाचे उत्पादन घेतले जाते. अर्थातच उत्तर प्रदेश राज्याची ऊस उत्पादनात मोठी मक्तेदारी पाहायला मिळते.

महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो

ऊस उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात 25.45% एवढे उसाचे उत्पादन घेतले जाते.

निश्चितच उत्तर प्रदेश राज्यापेक्षा आपल्या राज्यात उसाचे उत्पादन हे खूपच कमी आहे. तथापि ऊस उत्पादनाच्या बाबतीत उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचाच नंबर लागतो.

दरम्यान महाराष्ट्रनंतर कर्नाटक राज्याचा ऊस उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. एका आकडेवारीनुसार कर्नाटक राज्यात देशातील एकूण ऊस उत्पादनापैकी जवळपास 10.54% एवढे उसाचे उत्पादन घेतले जाते. अर्थातच महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक निम्म्याने उत्पादन कमी आहे.

Leave a Comment