मान्सून माघारी फिरला, पण ‘या’ भागात धो-धो पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने 19 ऑक्टोबर रोजी भारतातून मान्सून पूर्णपणे माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. खरतर, यंदा मान्सून हा नियोजित वेळेपेक्षा चार दिवस उशिराने माघारी फिरला आहे. पण आता मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून माघारी फिरला आहे.

यामुळे देशभरात कमाल तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कमाल तापमानात वाढ झाली असल्याने उकाडा वाढला आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे. ती म्हणजे देशातील काही भागांमध्ये आगामी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याचा परिणाम म्हणून उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेला थोडा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, देशभरातून मान्सूनने माघार घेतली आहे. पण मान्सून माघारी फिरला असला तरी देखील देशात अजूनही पावसाची शक्यता आहे. दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अजूनही पाऊस पडण्यास पूरक परिस्थिती तयार होत असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे.

हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दक्षिण भारतातील केरळमध्ये २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 23 ते 24 ऑक्टोबर दरम्यान या संबंधित भागात जोरदार वारे आणि ढगाचा गडगडाट देखील होणार असा अंदाज आहे.

तसेच ईशान्य भारतातही आगामी काही दिवस पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे 24 ऑक्टोबर रोजी ईशान्य भारतातील नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडण्यासाठी पूरक परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

तसेच ईशान्य भारतातील उर्वरित भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. या सोबतच हवामान खात्याने पुढील पाच दिवस देशाच्या इतर भागात हवामानात फारसा मोठा बदल होणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत यंदा चार दिवस उशिराने मान्सून माघारी फिरला असून मान्सून परतल्यानंतरही देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पावसाची शक्यता लक्षात घेता संबंधित विभागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहून आपली कामे करणे आवश्यक आहे.

Leave a Comment