Havaman Andaj Panjabrao Dakh : गेल्या अनेक दिवसांच्या सुट्टीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केल आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रासहित देशभरातील अनेक राज्यात पावसाने मोठा खंड पाडला होता. भर पावसाळ्यात पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आले होते.
मात्र आता शेतकऱ्यांची चिंता मिटणार असल्याचे चित्र आहे. कारण की राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा अंशतः मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पाऊस पडू लागला आहे.
गेल्या 24 तासात राज्यातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे सर्वत्र आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. वातावरणात गारवा तयार झाला आहे. भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विशेष म्हणजे येत्या काही तासात पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते असा अंदाज पुणे वेधशाळेने नुकताच वर्तवला आहे. अशातच पंजाबरावं डख यांनी देखील सप्टेंबर महिन्यात कोणत्या तारखांना पाऊस पडू शकतो याबाबत बहुमूल्य अशी माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून अर्थातच तीन सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच उद्यापासून म्हणजे 4 सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार असे त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे.
उद्यापासून ते 25 सप्टेंबर पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज आहे. यासोबतच ऑक्टोबर महिन्यातही राज्यात चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे भरून निघेल का हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत भारतीय हवामान विभागातील तज्ञांनी जरी सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार असला तरी देखील यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघणार नाही, राज्यात सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.