Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यात थंडीचा जोर वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाट आली आहे. जाता-जाता थंडी चांगलाच कहर माजवत आहे. काही ठिकाणी दाट धुके देखील पाहायला मिळत आहेत.
यामुळे दिवसादेखील विजीबिलिटी कमी झालेली आहे. परिणामी वाहनचालकांना सकाळी-सकाळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एकंदरीत महाराष्ट्रातील हवामान गेल्या काही दिवसांपासून आता कोरडे पाहायला मिळतं आहे. परंतु पावसाचा लहरीपणा पाहता आता अवकाळी पाऊस केव्हा बरसणार हे सांगता येत नाही.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने 28 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाचे अपडेट दिली आहे.
या कालावधीत देशातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी थंडीची तीव्रता आणखी वाढणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
कुठे बरसणार अवकाळी पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आजपासून पश्चिम हिमालयीन भागातील हवामानावर मोठा परिणाम दिसून येणार आहे. याचा परिणाम म्हणून 28 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे या कालावधीत जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हिमवृष्टी होणे अपेक्षित आहे.
याशिवाय उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे थंडीमुळे अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात कसे राहणार हवामान
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे पाहायला मिळत आहे. राज्यात आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागला आहे.
विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील हवामान आगामी काही दिवस असेच कोरडे राहणार आणि थंडीचा जोर कायम राहणार असा अंदाज काही तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.