गुंतवणूकदारांची चांदी…! ‘ही’ बँक एक हजार दिवसाच्या FD वर देते 9.50% व्याज, HDFC बँक किती व्याज देते ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank FD Interest Rate : एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. खरे तर गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र या साऱ्या पर्यायांमध्ये बँकेची एफडी हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

शिवाय अलीकडे देशातील अनेक बँकांनी एफडीच्या व्याजदरात चांगली वाढ केली आहे. यामुळे एफडीची गुंतवणूक सुरक्षित तर झालीच आहे शिवाय चांगला परतावा देखील मिळू लागला आहे.

दरम्यान आज आपण देशातील कोणती बँक एफडी साठी सर्वोत्कृष्ट व्याजदर ऑफर करत आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणती बँक देते एफ डी वर सर्वाधिक व्याजदर

मिळालेल्या माहितीनुसार, युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही छोटी फायनान्स बँक 1001 दिवसाच्या एफडी करिता तब्बल 9.50% एवढे व्याजदर ऑफर करत आहे. मात्र बॅंके कडून दिले जाणारे हे व्याजदर फक्त आणि फक्त ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.

याशिवाय या बँकेच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून ते 201 दिवसांच्या एफडी करिता ज्येष्ठ नागरिकांना 9.25%, 501 दिवसांच्या एफडी साठी जेष्ठ नागरिकांकरिता 9.25%, 701 दिवसांचा एफडी साठी ज्येष्ठ नागरिकांना 9.45% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.

एकंदरीत युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून एफडी साठी चांगले व्याज दिले जात आहे. दरम्यान आता आपण एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण एचडीएफसी बँकेचे एफडीचे व्याजदर काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

HDFC चे FD वरील व्याजदर

एचडीएफसी बँकेने घरगुती, एनआरओ, एनआरई ग्राहकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

नवीन दर 3 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहेत. बँक सर्वसामान्यांना ४.७५ टक्के ते ७.४० टक्के व्याज देत आहे.

त्याच वेळी, HDFC बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 5.25 टक्के ते 7.90 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवरील मानक दरांपेक्षा ५० बेसिस पॉइंट अधिक व्याज दिले जात आहेत.

Leave a Comment