HDFC Bank FD Scheme : एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी अतिशय महत्त्वाची आणि कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना एचडीएफसी बँकेत एफडी करायचे असेल अशांसाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
कारण की आज आपण एचडीएफसी बँकेच्या 15 महिने कालावधीच्या एफडी योजनेबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात विविध कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत.
गृह, वाहन, सुवर्ण, वैयक्तिक, शैक्षणिक इत्यादी कर्ज बँकेच्या माध्यमातून पुरवले जात आहेत. याशिवाय बँकेत मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकेकडून चांगला परतावा देखील दिला जात आहे.
एचडीएफसी बँक 15 महिन्यांच्या एफडीसाठी किती व्याज देते
मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून 15 महिन्यांच्या एफडी करिता 7.10% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.
मात्र हा व्याजदर दोन कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठीच लागू राहणार आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यापेक्षा अधिकची गुंतवणूक केली तर त्याला हा व्याजदर लागू राहणार नाही.
विशेष बाब अशी की 15 महिने कालावधीच्या आणि दोन कोटी रुपयांपर्यंतच्या मर्यादित गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत 0.50 टक्के अधिकचे व्याज ऑफर केले जात आहे.
म्हणजेच याचं कालावधीच्या एफडीमध्ये जर ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.60% एवढे व्याज मिळणार आहे.
दोन लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न
जर सामान्य ग्राहकाने एचडीएफसी बँकेत 15 महिन्यांच्या कालावधीसाठी दोन लाख रुपयाची गुंतवणूक केली तर सदर ग्राहकाला मॅच्युरिटीवर दोन लाख अठरा हजार 304 रुपये मिळणार आहेत. अर्थातच 18304 रुपयांचे व्याज या एफ डी योजनेतून मिळणार आहे.
दुसरीकडे जर ज्येष्ठ नागरिकांनी एचडीएफसी बँकेच्या 15 महिन्यांच्या कालावधीच्या एफडी मध्ये दोन लाख रुपये गुंतवले तर सदर ग्राहकाला मॅच्युरिटीवर दोन लाख 19 हजार 641 रुपये मिळणार आहेत. यामध्ये १९६४१ रुपये व्याज मिळणार आहे.