HDFC Bank Home Loan : एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही प्रायव्हेट बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात गृह कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे.
अलीकडे, घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये घराच्या किमती सातत्याने वाढत आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, बिल्डिंग मटेरियलचे वाढत असलेले दर, वाढती मजुरी इत्यादी कारणांमुळे घरांच्या किमती वाढत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
अशा परिस्थितीत, सर्वसामान्य आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाचा आधार घेत असतात. बँका देखील आता परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या गृह कर्जाची माहिती पाहणार आहोत.
कोणाला मिळणार गृह कर्ज ?
बँकेकडून सर्वच ग्राहकांना गृह कर्ज दिले जात आहे. पगारदार लोकांना तसेच स्वतःचा बिझनेस करणाऱ्या लोकांना सुद्धा गृह कर्ज दिले जात आहे. बँकेकडून ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज मिळते.
ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँका कमी व्याजदरात कर्ज देतात. तसेच चांगला सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना अधिक कर्ज मंजूर होते.
कर्ज लवकरात लवकर मंजूर होत असते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जात असतो. ज्यांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो त्यांना कमी व्याज दरात आणि अधिक कर्ज मंजूर होते.
एचडीएफसी बँक किती व्याज आकारते
एचडीएफसी बँक 8.70% ते 9:38% या व्याज दरात ग्राहकांना कर्ज मंजूर करत असते. स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या आणि पगारदार लोकांना बँकेच्या माध्यमातून 9.05% ते 9.80% व्याजदरात गृह कर्ज ऑफर केल जात आहे.
बँकेकडून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होते. दरम्यान आता आपण जर एखाद्याने 50 लाख रुपयाचे कर्ज घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागणार हे जाणून घेणार आहोत.
50 लाखाचे कर्ज घेतल्यास किती व्याज ?
एखाद्याला तीस वर्ष कालावधीसाठी 50 लाख रुपयांचे कर्ज नऊ टक्के व्याज दरात मिळाले तर सदर व्यक्तीला चाळीस हजार 231 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
तसेच जर तीस लाख रुपयांचे कर्ज नऊ टक्के व्याजदरात वीस वर्षांच्या कालावधीसाठी मिळाले तर त्याला 26992 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. जर वीस लाख रुपयांचे कर्ज 30 वर्षांच्या कालावधीसाठी मिळाले तर त्याला 16 हजार 92 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.