सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली ! पगारात झाली 20 हजाराची वाढ, महागाई भत्ता नाही तर ‘या’ भत्त्याच्या वाढीने मिळाला दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : लवकरच 18 व्या लोकसभेसाठी निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे. आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू झाली आहे. प्रचार सभांना सुरवात झाली आहे. राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली असून आगामी निवडणुकीत आपला जय व्हावा यासाठी राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांपर्यंत वाढवला गेला आहे.

शासनाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महागाई भत्त्यात झालेली ही सुधारणा 1 जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. पण वाढीव महागाई भत्ताचा रोख लाभ एप्रिलमध्ये दिला जाईल.

अर्थातच मार्च महिन्याचे जे वेतन कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळेल त्यासोबत याचा लाभ दिला जाणार आहे. शिवाय, महागाई भत्त्याबरोबरच इतर भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे.

या भत्त्यांमधील सर्वात मोठा बदल हा हाऊस रेंट अलाऊन्स (एचआरए) मध्ये आला आहे. महागाई भत्ता ५०% च्या वर गेल्याने, HRA देखील सुधारित करण्यात आला आहे. सरकारने जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढवून 50 टक्के केला आहे.

DA 50 टक्क्यांपेक्षा जास्त होताच, HRA आपोआप सुधारित झाला आहे. HRA चे नवीन दर आता 30%, 20% आणि 10% झाले आहेत. त्याचा लाभ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना मिळण्यास सुरुवात होईल.

शहराच्या वर्गवारीनुसार X, Y आणि Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के दराने एचआरए दिला जाणार आहे. आधी X, Y आणि Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27%, 18% आणि 9% एवढा HRA दिला जात होता.

पण आता यामध्ये 1 टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. डीएसह ही वाढ देखील १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. आता आपण घर भाडे भत्ता वाढल्यानंतर पगारात किती वाढ होणार हे एका उदाहरणातून समजून घेणार आहोत.

किती वाढणार पगार ? 

समजा वेतन श्रेणी स्तर -1 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन दरमहा 56,900 रुपये एवढे आहे अन त्याला 30 टक्के HRA लागू झाला आहे. आता या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे आपण समजून घेणार आहोत. सर्वात आधी या सदर कर्मचाऱ्याला 27% दराने सध्या स्थितीला HRA = रु 56,900 x 27/100 = रु. 15,363 प्रति महिना एवढा घरबाडे भत्ता मिळत असेल.

पण 30% HRA पकडल्यास सदर कर्मचाऱ्याला आता रु 56,900 x 30/100 = रु. 17,070 प्रति महिना एवढा HRA मिळणार आहे. म्हणजे आता त्याच्या पगारात 1707 प्रति महिना एवढा घरभाडे भत्ता वाढणार आहे. वार्षिक आधारावर सदर कर्मचाऱ्याला 20,484 रुपये एवढे वाढीव घर भाडे भत्ता मिळणार आहे.

Leave a Comment