दादरहुन पंढरपूरपर्यंत धावणाऱ्या एक्सप्रेसचा ‘या’ शहरापर्यंत विस्तार ! वारकऱ्यांना मिळणार दिलासा, विस्तारित सेवा केव्हापासून सुरू होणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dadar To Pandharpur Express : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने आणि रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूप अधिक आहे.

दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे दादर ते पंढरपूर दरम्यान सुरू असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील एक्सप्रेस ट्रेनला आता सातारा पर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे राज्यातील या सदर भागातील विठुरायांच्या भाविकांना, वारकऱ्यांना जलद गतीने पंढरपूरला जाता येईल आणि विठुरायाचे दर्शन घेणे सोयीचे होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर- पंढरपूर- दादर एक्स्प्रेसचा मिरज- सांगली मार्गे सातारापर्यंत विस्तार वाढवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ही विस्तारित मार्गावरील सेवा आज अर्थातच 15 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या विस्तारित रेल्वे सेवेची सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक

दादर-पंढरपूर एक्सप्रेस आता सातारा पर्यंत धावणार आहे. आज पासून अर्थातच 15 मार्च 2024 पासून ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे. ही एक्सप्रेस त्रि-सप्ताहिक असेल म्हणजेच आठवड्यातून तीनदा होणार आहे.

दादर-सातारा एक्स्प्रेस दादरहून दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी सुटणार आहे. या दिवशी ही गाडी दादर रेल्वे स्थानकावरून २३.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४.१० वाजता सातारा येथे पोहोचणार आहे.

तसेच सातारा दादर त्रि साप्ताहिक एक्सप्रेस  १६ मार्चपासून चालवली जाणार आहे. सातारा – दादर एक्स्प्रेस सातारा येथून दर सोमवार, मंगळवार आणि शनिवारी सुटणार असल्याची माहिती रेल्वे आहे.

या दिवशी ही गाडी सातारा रेल्वे स्थानकावरून १५.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३५ वाजता दादरला पोहोचणार आहे.

विस्तारित मार्गावरील थांबे कोणते ?

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, या एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर आणि कोरेगाव या रेल्वे स्थानकावर आता थांबा मंजूर राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील भाविकांना या एक्सप्रेसचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे.

Leave a Comment