HDFC Bank Personal Loan : एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. वाहन कर्ज, गृह कर्ज, गोल्ड लोन तसेच पर्सनल लोन देखील बँकेकडून उपलब्ध करून दिले जात आहे.
मात्र बँक या विविध कर्जांसाठी वेगवेगळे व्याजदर आकारते. पर्सनल लोनसाठी इतर कर्जांच्या तुलनेत अधिकचे व्याजदर आकारले जाते. तथापि पैशांची अचानक गरज उद्भवली तर ग्राहक एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतात.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून जर एचडीएफसी बँकेकडून पाच लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो ? याविषयी विचारणा केली जात होती. दरम्यान आज आपण याच संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर
एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना किमान 10.75 टक्के या व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. परंतु हा बँकेचा किमान व्याजदर आहे.
या व्याजदरात फक्त अशाच ग्राहकांना कर्ज मंजूर होते ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा व्यक्तींना या किमान व्याजदरात एचडीएफसी बँक कर्ज मंजूर करू शकते.
पाच लाखाच्या कर्जासाठी कितीचा हप्ता?
जर एचडीएफसी बँकेकडून एखाद्या ग्राहकाला पाच वर्षांच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर झाले तर त्याला 10,809 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
पाच वर्षांच्या कालावधीसाठी 10,809 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. म्हणजेच सदर ग्राहकाला पाच वर्षाच्या कालावधीत 1 लाख 48 हजार 540 रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे.
अर्थातच या कालावधीत ग्राहकाला 1 लाख 48 हजार 540 रुपयांचे व्याज आणि 5 लाख रुपये मूळ रक्कम असे एकूण 6 लाख 48 हजार 540 रुपये भरावे लागणार आहेत.
प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार !
एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्जासाठी प्रोसेसिंग फी देखील आकारते. यामुळे पाच लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास व्याजाव्यतिरिक्त ग्राहकाला प्रोसेसिंग फी चे देखील पैसे द्यावे लागणार आहेत.
यामुळे हे कर्ज आणखी महाग होणार आहे. ग्राहकाला वैयक्तिक कर्जासाठी प्रोसेसिंग फी तसेच इतर अन्य चार्जेस भरावे लागतात. प्रत्येक बँकेची वैयक्तिक कर्जासाठीची प्रोसेसिंग फी ही वेगवेगळी असते.