राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ शहरांमधून धावणार, पहा रूट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतं आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गावाकडे जात आहेत. याशिवाय उन्हाळी सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी पर्यटक देखील पर्यटन स्थळावर गर्दी करत आहेत. यामुळे सध्या रेल्वे मार्गांवर मोठी गर्दी पाहायला मिळते.

याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून विविध मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर पश्चिम रेल्वेने देखील काल अर्थातच 9 एप्रिल ला एक मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार सिकंदराबाद ते उदयपूर उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी मराठवाडा अन विदर्भातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधून धावणार आहे.

दरम्यान आता आपण याच उन्हाळी विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेणार आहोत तसेच या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे हे पाहणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक ?

मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद ते उदयपूर दरम्यानची उन्हाळी विशेष ट्रेन 16 ते 23 एप्रिल या कालावधीत चालवली जाणार आहे.

ही विशेष गाडी या कालावधीत प्रत्येक मंगळवारी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून रात्री 23:50 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून 49 मिनिटांनी विदर्भातील वाशिम रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे आणि तिसऱ्या दिवशी ही गाडी उदयपूर येथे पोहोचणार आहे.

तसेच उदयपूर ते सिकंदराबाद विशेष गाडी 20 ते 27 एप्रिल या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही विशेष गाडी प्रत्येक शनिवारी उदयपूर येथून दुपारी 16:05 वाजता रवाना होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांनी ही गाडी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर येणार आहे.

या गाडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी ही गाडी खूपच फायद्याची ठरणार आहे.

कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?

मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष गाडीला या मार्गावरील बोलारम, मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, संत हिरदाराम नगर, शुजालपूर, उज्जैन, नागदा, शामगढ, कोटा, सवाईमाधोपुर, जयपूर, नसीराबाद, विजयनगर, भीलवाडा, मावली, राणाप्रतानगर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.

Leave a Comment