HDFC Bank RD Scheme : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी ही एक देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील मोठी बँक आहे. प्रायव्हेट सेक्टरमधील ही देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते.
एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर मधील म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे तर एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे.
दरम्यान एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडी योजनेवर चांगले व्याज ऑफर करत आहे. शिवाय या बँकेकडून ग्राहकांना आरडी योजनेवर देखील चांगले व्याज दिले जात आहे.
दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या आरडी योजनेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एचडीएफसी बँकेच्या आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना बँकेकडून किती व्याज दिले जाते याविषयी आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
एचडीएफसी बँकेचे आरडी योजनेवरील व्याजदर
बँकेची आरडी योजना अशा लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरते ज्यांना एकमुस्त पैसा गुंतवता येत नाही. आरडी योजनेत गुंतवणूकदारांना दर महिना एक ठराविक रक्कम गुंतवता येते आणि या गुंतवलेल्या रकमेवर बँकेकडून ठराविक व्याजदर ऑफर केले जाते.
एचडीएफसी बँकेकडून देखील आरडी योजना चालवली जात आहे. या बँकेच्या 90 महिन्यांच्या आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना बँकेकडून सात टक्के एवढे व्याज ऑफर केले जात आहे.
र्थातच एचडीएफसी बँकेच्या या योजनेत गुंतवणूकदार दरमहिना छोटी-छोटी अमाऊंट गुंतवणूक करून एक चांगला मोठा फंड तयार करू शकणार आहेत.
विशेष बाब अशी की, ज्येष्ठ नागरिकांनी जर एचडीएफसी बँकेच्या या आरडी योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना 0.75 टक्के अधिकचे व्याज मिळणार आहे. अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणुकीसाठी 7.75 टक्के एवढे व्याजदर पुरवले जाणार आहे.
मासिक 9,000 ची गुंतवणूक केल्यास किती रक्कम मिळणार
जर समजा एचडीएफसी बँकेच्या या 90 महिन्यांच्या आरडी योजनेत सामान्य नागरिकांनी दर महिना 9 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर दहा लाख 65 हजार 835 रुपये मिळणार आहेत.
मात्र ज्येष्ठ नागरिकांना दर महिना 90 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी वर दहा लाख 98 हजार 777 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.