म्हाडाची ‘या’ शहरात 941 घर आणि 361 भूखंडांसाठी लॉटरी ! अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात, पहा संपूर्ण टाईमटेबल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : अलीकडे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करताना सर्वसामान्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता घर खरेदी करणे सोपे राहिलेले नाही. मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे इत्यादी महानगरांमध्ये घरांच्या किमती खूपच कडाडल्या आहेत.

अशा परिस्थितीत सर्वसामान्य घर निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. म्हाडाची परवडणारी घरे सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

दरम्यान जर तुम्हीही म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असाल आणि तुम्हालाही छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःची सदनिका खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी म्हाडा एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज घेऊन समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण, क्षेत्रविकास मंडळाअंतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये तब्बल 941 घरं आणि 361 भूखंडांसाठी म्हाडाने लॉटरी काढली आहे.

या लॉटरीमध्ये समाविष्ट असलेली घर आणि भूखंड छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्हा, लातूर , जालना , नांदेड , हिंगोली, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात आहेत.

दरम्यान या लॉटरीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या घरांसाठी आणि भूखंडांसाठी 28 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर या घरांसाठी अर्ज करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

या लॉटरीबाबत मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील या घरांसाठी integrated housing lottery management system (IHLMS 2.0)  या नव्या पद्धतीनं आणि अॅपच्या सहाय्यानं अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. हे एप्लीकेशन अँड्रॉइड प्लेस्टोर आणि ios च्या ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.

या सोडतीसाठी तयार करण्यात आलेली अर्ज सादर करण्याची लिंक ही 27 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. अर्थातच या सोडतीसाठी इच्छुकांना 27 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

विशेष म्हणजे याच कालावधीत अर्जदारांना अनामत रक्कम देखील भरायची आहे. यानंतर 4 एप्रिलला या सोडतीसाठी सादर केलेल्या अर्जांपैकी पात्र ठरलेल्या अर्जांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.

Leave a Comment