एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी !! 2 लाखाचे पर्सनल लोन घेतल्यास कितीचा EMI भरावा लागणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Personal Loan Details : एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक आहे. दरम्यान, या बँकेच्या ग्राहकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. ही बातमी अशा ग्राहकांसाठी कामाची ठरणार आहे ज्यांना एचडीएफसी कडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल.

खरंतर, एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज ऑफर करत आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज, सुवर्ण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, वैयक्तिक कर्ज असे नानाविध प्रकारचे कर्ज बँक उपलब्ध करून देत आहे.

दरम्यान या विविध कर्जांसाठी बँकेकडून वेगवेगळे व्याजदर आकारले जात आहे. मात्र बँक इतर कोणत्याही कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याज आकारते.

फक्त एचडीएफसी बँकच असे करते असे नाही तर जवळपास सर्वच बँका इतर कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर आकारतात. याचे कारण म्हणजे हा कर्ज प्रकार असुरक्षित कर्ज प्रकारात येतो.

असे कर्ज देणे बँकेसाठी जोखीम पूर्ण असते. त्यामुळे बँका या प्रकारच्या कर्जासाठी अधिकचा इंटरेस्ट रेट वसूल करतात. हेच कारण आहे की तज्ञ लोक जेव्हा खूपच इमर्जन्सी असेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा पर्याय स्वीकारला पाहिजे.

अन्यथा इतर अन्य मार्गांनी पैशांची उपलब्धता केली पाहिजे असा सल्ला देतात. तथापि जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर आज आपण एचडीएफसीच्या पर्सनल लोनची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

HDFC पर्सनल लोन

मिळालेल्या माहितीनुसार, प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी आपल्या ग्राहकांसाठी किमान 10.75% या व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. तथापि बँकेचा हा किमान व्याजदर आहे. या व्याजदराचा सर्वांनाच लाभ मिळणार नाही.

ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच या व्याजदरात वैयक्तिक कर्ज मंजूर होऊ शकते. 800 च्या आसपास सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना या किमान व्याजदरात वैयक्तिक कर्ज मंजूर होऊ शकते.

जर समजा तुम्हाला या किमान व्याजदरात म्हणजेच 10.75% या इंटरेस्ट रेटमध्ये दोन लाख रुपयांचे कर्ज पाच वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर तुम्हाला 4324 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच तुम्हाला या कालावधीत 59 हजार 440 रुपये व्याज स्वरूपात भरावे लागणार आहे. प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच मूळ रक्कम दोन लाख रुपये प्लस 59 हजार 440 रुपये व्याज असे एकूण दोन लाख 59 हजार 440 रुपये भरावे लागणार आहेत.

Leave a Comment