HDFC RD Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जाते. यामुळे अनेकजण बँकेच्या एफडी योजनेत आणि आरडी योजनेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात.
जर तुम्हीही त्यातल्याच एका साला आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी किंवा आरडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे.
कारण की आज आपण देशातील प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेच्या आरडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
खरेतर आरडी योजना अशा लोकांसाठी फायदेशीर ठरते ज्यांना एकरकमी पैसे गुंतवता येत नाहीत. आरडी योजनेत दरमहा ठराविक रक्कम गुंतवता येते.
दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या 36 महिन्याच्या अर्थातच तीन वर्षांच्या आरडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
या तीन वर्षांच्या योजनेसाठी बँकेकडून किती व्याज मिळते? दर महिना 3600 गुंतवणूक केल्यास 36 महिन्यानंतर या योजनेतून गुंतवणूकदारांना किती परतावा मिळणार याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत.
एचडीएफसीच्या 36 महिन्यांच्या आरडी योजनेसाठीचे व्याजदर
एचडीएफसी बँकेकडून सर्वसामान्य ग्राहकांना 36 महिन्यांच्या आरडी योजनेसाठी सात टक्के एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे. दुसरीकडे याच कालावधीच्या आरडीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे.
म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 0.50 टक्के एवढे अधिकचे व्याज दिले जात आहे. त्यामुळे बँकेची ही आरडी योजना ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
दरमहा 3600 गुंतवले तर
जर या 36 महिन्यांच्या आरडी मध्ये सामान्य ग्राहकांनी प्रत्येक महिन्याला 3600 गुंतवले तर मॅच्युरिटी वर एक लाख 44 हजार 531 रुपये मिळणार आहेत.
मात्र ज्येष्ठ नागरिकांना एक लाख 45 हजार 674 रुपये मिळणार आहेत. अर्थातच एचडीएफसी बँकेची ही आरडी योजना ज्येष्ठ ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे