पुणेकरांनो पैसे तयार ठेवा ! म्हाडाच्या 1700 हुन अधिक घरांसाठी ‘या’ तारखेला सुरू होणार अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सदनिकांच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांचे टेन्शन वाढवत आहेत. खरे तर आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे, हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल.

मात्र हे स्वप्न पूर्ण करताना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. भविष्यात या किमती आवाक्याबाहेर जाणार असे दिसत आहे.

यामुळे अनेकांच्या माध्यमातून लवकरात लवकर गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता पुणे, मुंबई सारख्या महानगरांमध्ये म्हाडाच्या घरांना विशेष पसंती दाखवली जात आहे.

दरम्यान, जर तुम्हीही म्हाडाच्या घरांची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे म्हाडाच्या पुणे मंडळांने 1700 हून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीत 20 टक्के योजनेच्या घरांचा समावेश करण्यात आला आहे.

पुणे मंडळाने काढलेल्या या लॉटरीसाठी अजून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे पुणेकरांना म्हाडाचे घर हवे असेल तर त्यांना आतापासूनच पैशांची जमवाजमव करावी लागणार आहे.

दरम्यान पुणे मंडळाकडून काढल्या जाणाऱ्या या 1700 हून अधिक घरांच्या लॉटरीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया केव्हा सुरू होणार हा सवाल पुणेकरांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

केव्हा सुरू होणार अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया

पुणे मंडळाच्या या लॉटरीसाठी पुढील महिन्यात अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे मंडळाच्या 1700 हून अधिक सदनिकांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू होणार आहे.

विशेष म्हणजे येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आचारसंहिता लागणार आहे.

दरम्यान या साऱ्या पार्श्वभूमीवर पुणे मंडळाकडून आचारसंहिताच्या कालावधीमध्ये  या घरांसाठी अर्ज मागवले जाणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच आचारसंहिता पार पडली की मग या घरांसाठी लॉटरी निघेल अशी माहिती समोर येत आहे. यामुळे अनेकांचे गृहनिर्मितीचे स्वप्न आता प्रत्यक्षात खरे उतरणार आहे. 

Leave a Comment