‘या’ काळात चुकूनही बडीशेपचे सेवन करू नये, अन्यथा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips : भारतीय स्वयंपाक घरात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. ज्यात बडीशेप देखील समाविष्ट आहे. बडीशोप हा मसाल्याचा एक प्रमुख पदार्थ आहे. बडीशोपचा वापर मसाल्यात तर केला जातोच शिवाय माऊथ फ्रेशनर म्हणूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. हा मसाल्याचा असा एक पदार्थ आहे जो की जेवणाची चव वाढवतो.

अनेकजण कच्ची बडीशोप सुद्धा खातात. खरेतर बडीशेप मध्ये असणारे पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. यामुळे अनेक लोक याचे आवडीने सेवन करतात. काही लोकांना जेवणानंतर हमखास बडीशेप लागते.

माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खायला अनेकांना आवडते. हॉटेलमध्ये देखील जेवणानंतर बडीशोप आणि खडीसाखर माऊथ फ्रेशनर म्हणून दिले जाते. शरीराला थंडावा देण्यासाठीही याचे सेवन केले जाऊ शकते. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे बडीशेपचे सेवन केल्याने उष्णतेपासून आराम मिळतो.

मात्र या पदार्थाचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत. दरम्यान आज आपण बडीशेप खाण्याचे तोटे नेमके काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बडीशेपचे जास्त सेवन केले तर मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

विशेषता उन्हाळ्यात बडीशेपचे जास्त सेवन केले तर यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. दरम्यान आता आपण जास्त प्रमाणात बडीशेपचे सेवन केले तर मानवी आरोग्यावर कोण-कोणते साईड इफेक्ट होऊ शकतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सर्दी होऊ शकते : तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर उन्हाळ्यात बडीशेप जास्त प्रमाणात खाल्ली तर आरोग्य बिघडू शकते. बडीशेप उष्णते पासून आराम देते. पण, सर्दी झाली असेल आणि याचे सेवन केले तर ही समस्या आणखी वाढू शकते. यामुळे सर्दी झालेली असेल तर बडीशेप खाणे टाळावे.

पोटाच्या समस्या : तसेच, बडीशेप जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे ते योग्य प्रमाणातच सेवन करणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात याचे सेवन केले तर पोट दुखी वाढू शकते.

ऍलर्जीची समस्या : जर एखाद्या व्यक्तीने बडीशेप जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याला ॲलर्जीची समस्या जाणवू शकते. जर ती व्यक्ती कोणत्याही प्रकारचे औषधे घेत असेल तर अशा व्यक्तीला एलर्जीची समस्या जाणवण्याची शक्यता अधिक असते. यामुळे पोटदुखी आणि शिंका येणे अशा काही समस्येचा सदर व्यक्तीला सामना करावा लागु शकतो. यामुळे बडीशेपचे जास्ती सेवन करणे टाळावे.

त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात – बडीशेप जास्त प्रमाणात खाल्ली तर व्यक्तीच्या त्वचेवर पुरळ उठू शकतात. विशेषता उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बडीशेप चे सेवन केले तर ही समस्या जाणवण्याची शक्यता अधिक असते. यामुळे याचे कधीही प्रमाणातचं सेवन केले गेले पाहिजे.

Leave a Comment