Home Buying Tips : जर तुम्हीही तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. खरंतर, आपल्यापैकी अनेकांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले असेल तर काहीजण घराच्या स्वप्नांसाठी अहोरात्र काबाडकष्ट करत असतील.
वास्तविक, घर बनवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी अचीवमेंट आहे. मात्र घर बनवणे अलीकडे अवघड बनले आहे. घरांच्या वाढत्या किमती पाहता घरांचे स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नाही. अनेकजण पैशांच्या कमतरतेमुळे, योग्य ठिकाणावर घर मिळत नसल्याने, कर्ज उपलब्ध होत नसल्याने नवे घर खरेदी करण्याऐवजी जुने घर खरेदी करतात.
खर तर जुने घर खरेदी करणे काही कारणास्तव फायदेशीर ठरते. जुने घर खरेदी करण्याचा एक फायदा असा आहे की घरात जाण्यासाठी बांधकाम पूर्ण होण्यापर्यंत वाट पाहावी लागत नाही. म्हणजेच जुने खर खरेदी केले की लगेचच त्या घरात शिफ्ट होता येते.
मात्र असे असले तरी जुने घर खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे देखील जरुरीचे आहे नाहीतर जुने घर खरेदी करणे महागात पडू शकते. दरम्यान आज आपण जुने घर खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रियल इस्टेट तज्ञ सांगतात की, प्रॉपर्टीचे वय किती आहे अर्थातच जुने घर किती काळ जुने आहे याविषयी सर्वप्रथम जाणून घेणे आवश्यक आहे. साधारणपणे 50 वर्षांपेक्षा अधिक जुने असलेले घर खरेदी करणे टाळावे. अशा घरांमध्ये संरचनात्मक समस्या असू शकतात आणि मोठ्या दुरुस्ती, नूतनीकरण किंवा काही प्रकरणांमध्ये पुनर्बांधणीची आवश्यकता असू शकते.
अशा परिस्थितीत जुन्या घरांसाठी जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. रिअल इस्टेट तज्ञ सांगतात की, काँक्रीट स्ट्रक्चरचे वय हे साधारणतः 75 ते 100 वर्ष एवढे असते. म्हणजेच काँक्रीट स्ट्रक्चर 75 ते 100 वर्षे टिकते.
अपार्टमेंटमध्ये घर असल्यास त्याच्याविषयी 50 ते 60 वर्षे असते. म्हणजेच अपार्टमेंटमधील घर 50 ते 60 वर्षे टिकते. स्वातंत्र्य जमिनीवर असलेल्या घराचे वय मात्र यापेक्षा अधिक राहते. यामुळे जुन्या फ्लॅटची किंमत ही जुन्या घरापेक्षा कमी असते.
जुने घर खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या
जुनी मालमत्ता अर्थातच घर खरेदी करण्यापूर्वी त्या मालमत्तेची सर्व माहिती जाणून घ्या. मालमत्तेची मूळ कागदपत्रे अवश्य पडताळून पहा.
तुम्ही जे जुने घर खरेदी करत आहात त्यावर बँकेचे कर्ज आहे का किंवा इतर काही थकबाकी आहेत का याविषयी पडताळून पहा. अशा मालमत्तेविषयी न्यायालयात काही खटले सुरू आहेत का? याबाबत देखील पडताळणी करणे आवश्यक राहते.
अशी मालमत्ता खरेदी करताना हस्तांतरण आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. हे शुल्क काही अधिकारक्षेत्रांमध्ये अधिक असू शकते.