पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ ठिकाणी तयार होणार मेट्रो मार्ग, प्रस्ताव तयार; महापालिका लवकरच देणार अंतिम मान्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : पुणे अगदी पेशव्यांच्या काळापासून एक गजबजलेल शहर आहे. शहराला अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हे शहर महाराष्ट्राची संस्कृतीचे दर्शन घडवणारे शहर म्हणून ओळखले जाते आणि कदाचित हेच एक महत्त्वाचे कारण आहे की, शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.

हे केवळ कॅपिटल शहर आहे असे नाही तर पुणे शहराची ओळख शिक्षणाची माहेरघर म्हणून होते. या शहरात शिक्षणासाठी संपूर्ण देशभरातून तसेच जगभरातून लाखो विद्यार्थी येतात. येथे स्थायिक होतात. अलीकडील काही वर्षात शहरात रोजगारानिमित्त येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

कामानिमित्त पुण्यात स्थायिक होणाऱ्याची संख्या देखील लाखोंच्या घरात आहे. साहजिकच पुणे शहराचा जेवढ्या वेगाने विकास होत आहे तेवढ्याच वेगाने शहरातील लोकसंख्या देखील वाढली आहे. लोकसंख्या वाढली असल्याने आता शहरातील वाहतुकीची व्यवस्था तोकडी सिद्ध होत आहे.

परिणामी शहरातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात आता मेट्रो मार्ग सुरू केले जात आहेत. दरम्यान पुणे शहरातील मेट्रोमार्गासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आमच्या हाती आली आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की शहरात वनाज ते गरवारे महाविद्यालय या दरम्यान मेट्रो मार्ग सुरू आहे. यादरम्यान सुरू झालेल्या मेट्रोमार्गामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे आता याचा विस्तारित मार्ग लवकरच सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल दरम्यान मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. या मेट्रो मार्गावर सध्या मेट्रोच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचणीचे कामे अंतिम टप्प्यात आली असून आता लवकरच या मार्गावर मेट्रो सुरु होणार आहेत.

पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मार्ग एक ऑगस्ट 2023 पासून प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. अर्थातच पुढील महिन्यापासून हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. निश्चितच यामुळे शहरातील प्रवास अधिक जलद आणि गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.

अशातच आता शहरातील मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यानुसार कात्रज ते निगडी आणि खडकवासला ते हडपसर या मार्गावर मेट्रो सुरु करण्यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थात विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. या डीपीआरला महापालिकेकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे.

या डीपीआरला आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर मग या विस्तारित मार्गासाठी केंद्र आणि राज्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. केंद्र आणि राज्याची परवानगी मिळाल्यानंतर मग या विस्तारित मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Comment