Home Loan Default : तुम्हीही जर एखाद्या बँकेतून होम लोन घेतलं असेल किंवा नजीकच्या भविष्यात होम लोन घेऊ इच्छित असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकांचे घराचे स्वप्न असेल. स्वतःचे हक्काचे एक घर असावे जिथे उर्वरित आयुष्य आपल्या परिवारासमवेत आनंदात जगता यावे असे साधे स्वप्न प्रत्येकाचेच असते.

या स्वप्नासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट देखील करतो. मात्र वाढती महागाई आणि घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती या साऱ्या पार्श्वभूमीवर घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोनचा पर्याय स्वीकारावा लागतो. मात्र, काहीवेळा नोकरी गेल्यानंतर किंवा मेडिकल इमर्जन्सी उद्भवल्यास होम लोनचे हप्ते भरले जात नाही.

Advertisement

अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून होम लोनचे किती हप्ते भरले नाहीत तर बँक घराचा ताबा घेते किंवा घराचा लिलाव करते असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Home Loan चे किती हफ्ते थकलेत तर बँक कारवाई करते

Advertisement

आरबीआयच्या गाईडलाईनुसार होम लोन घेतलेल्या एखाद्या कर्जदाराने किती हप्ते थकवले तर त्याच्यावर कारवाई होते याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत. खरेतर जर एखाद्या ग्राहकाने पहिल्यांदा गृहकर्जाचा हप्ता भरला नाही तर बँक किंवा वित्तीय संस्था त्याला फारसे चिंतेचे मानत नाहीत.

परंतु जेव्हा ग्राहक सलग दोन ईएमआय भरत नाही, तेव्हा बँक प्रथम त्या ग्राहकाला EMI भरण्यास कळवते. पण जर यानंतरही ग्राहकाने EMI भरला नाही तर बँक कायदेशीर नोटीस पाठवते.

Advertisement

म्हणजे सलग तीन हप्ते थकवल्यानंतर बँकेकडून कायदेशीर नोटीस पाठवली जाते. कायदेशीर नोटीसनंतर कर्जाची परतफेड न केल्यास बँक ग्राहकाला डिफॉल्टर घोषित करते. तसेच बँक कर्ज खाते NPA मानते.

इतर वित्तीय संस्थांच्या बाबतीत ही मर्यादा १२० दिवसांची असते. या कालमर्यादेनंतर बँक वसुली प्रक्रियेचा विचार करू लागते. साधारणपणे तीन महिने ईएमआय न भरल्यानंतर बँक ग्राहकाला आणखी दोन महिने देते.

Advertisement

ग्राहकाने यातही चूक केल्यास, बँक ग्राहकाला मालमत्तेच्या अंदाजे मूल्यासह लिलावाची सूचना पाठवते. लिलावाच्या तारखेपूर्वी म्हणजे लिलावाची सूचना मिळाल्यानंतर एक महिन्यानंतरही ग्राहकाने हप्ता भरला नाही तर, बँक लिलावाची औपचारिकता पुढे नेते.

तथापि, या 6 महिन्यांत, ग्राहक कधीही बँकेशी संपर्क साधू शकतो आणि थकबाकीची रक्कम भरून प्रकरण मिटवू शकतो. कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यामुळे सर्वात मोठा तोटा म्हणजे बँक ग्राहकाला डिफॉल्टर घोषित करते.

Advertisement

यामुळे ग्राहकाचा CIBIL/क्रेडिट स्कोअर खराब होतो. खराब CIBIL स्कोरमुळे, भविष्यात कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणे कठीण होऊन बसते.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *