Home Loan EMI : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये महागाईचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे आता सर्वसामान्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत नाही. वाढत्या महागाईने घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांना एकरकमी घर घेणे शक्य होत नाहीये.
त्यामुळे आता घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण गृहकर्जाचा पर्याय स्वीकारत आहेत. विशेष म्हणजे जाणकार लोक देखील आता सर्वसामान्यांना गृहकर्ज घेऊन घरात इव्हेस्टमेंट करण्याचा सल्ला देऊ लागले आहे. देशातील अनेक बँका आता सर्वसामान्यांना स्वस्तात गृह कर्ज पुरवत आहेत. गृह कर्जाची प्रोसेस देखील आता बँकांनी खूपच सोपी केली आहे.
दरम्यान आजची ही बातमी गृह कर्ज घेतलेल्या लोकांसाठी आणि कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचे राहणार आहे. कारण की, आज आपण होम लोनचा हप्ता भरला नाही तर काय होऊ शकते, याचे कर्जदारावर काय परिणाम होणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
होम लोनचा हप्ता भरला नाही तर काय होणार?
होम लोन घेतलेल्या लोकांना प्रत्येक महिन्याला एका ठराविक रक्कमेचा हफ्ता भरावा लागतो. मात्र अनेकांना काही कारणास्तव हा हप्ता भरता येत नाही. अशा परिस्थितीत अशा लोकांच्या फायनान्शिअल स्टेटस वर विपरीत परिणाम होतो.
एक-दोन हप्ता मिस झाला तर काही हरकत नाही मात्र सातत्याने होम लोनचा हप्ता चुकत असेल तर यामुळे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. आता आपण होम लोनचा हप्ता भरला नाही तर नेमके काय होऊ शकते हे समजून घेणार आहोत.
क्रेडिट स्कोर कमी होणार
होम लोनचा हप्ता भरला नाही तर क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो. होम लोन चा एक हप्ता मिस झाला तरी क्रेडिट स्कोर वर परिणाम होतो. क्रेडिट स्कोर कमी असेल तर भविष्यात कर्ज मिळवण्यात अडचणी येतात. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड देखील मिळत नाही.
कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध होत नाही. कर्ज मिळाले तर कर्जाची रक्कम खूपच कमी राहते. बँका 750 पेक्षा अधिकचा क्रेडिट स्कोर असेल तरच कर्ज देण्यास इच्छुक असतात. चांगला क्रेडिट स्कोर राहिला तर कमी व्याज दरात कर्ज मिळते. यामुळे होम लोन चा हप्ता चुकणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
एक्सट्रा पेनल्टी भरावी लागणार
प्रत्येक EMI न भरल्यास, प्रलंबित रकमेव्यतिरिक्त, कर्जदाराला दंड आणि विलंब शुल्क देखील भरावे लागते. म्हणजेच होम लोन चा हप्ता चुकला तर पेनल्टी भरावी लागते. ही पेनल्टी अथवा दंड सहसा कर्जाच्या 1 ते 2% असतो. नियमित व्याज व्यतिरिक्त, दंड व्याज देखील लागू केले जाईल.
म्हणजेच पेनल्टी साठी देखील व्याज लागते. साहजिकच या दंडांमुळे कर्ज घेतलेल्या व्यक्तीवर आर्थिक भार वाढू शकतो. दरम्यान, कर्जदाराला थकबाकीची परतफेड करण्यासाठी सूट मिळते. जर पैसे जमा केले नाहीत तर कर्जदार कर्जाचे नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून वर्गीकरण करतो.
हे वित्तीय संस्थेला देय रक्कम वसूल करण्यासाठी SARFAESI कायदा 2002 अंतर्गत कर्जदाराच्या मालमत्तेचा किंवा तारणाचा लिलाव करण्याचा कायदेशीर अधिकार देते. म्हणजेच होम लोन जर एखाद्या व्यक्तीने भरले नाही तर अशा व्यक्तीची तारण ठेवलेली मालमत्ता लिलावात विकली जाते आणि यातून कर्जाची परतफेड होते.