Home Loan : तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत आहात का ? अहो, मग थांबा आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरेतर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे घर खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारला जात आहे.
विशेष म्हणजे स्वप्नातील सदनीका खरेदी करण्यासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारणे काही अंशी फायदेशीर असल्याचे मत रियल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
अलीकडे देशातील अनेक सरकारी आणि प्रायव्हेट क्षेत्रामधील बँकांनी परवडणाऱ्या व्याजदरात सर्वसामान्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
मात्र गृह कर्ज मिळवणे हे वाटते तेवढे सोपे नाही. कारण की हे कर्ज देताना बँकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पॅरामीटरवर कर्जदार व्यक्तीला पडताळले जाते.
बँकेकडून तुम्हाला किती पगार मिळतोय याची चाचपणी केली जाते. तुमच्या पगारानुसारच तुम्हाला बँकेकडून कर्ज मंजूर होणार आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण तुमच्या पगारानुसार तुम्हाला बँकेकडून किती होम लोन मिळू शकत, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती पगारावर किती कर्ज
जर तुमची इन हँड सॅलरी किंवा नेट मंथली इन्कम 25 हजार रुपये एवढी असेल तर तुम्हाला 18 लाख 64 हजार 338 रुपये एवढे होम लोन मंजूर होऊ शकते.
तसेच जर तुमची नेट मंथली इनकम तीस हजार रुपये एवढी असेल तर तुम्हाला 22 लाख 37 हजार 206 रुपये एवढे होम लोन मंजूर होऊ शकते. जर तुमचा मंथली नेट इन्कम 40,000 रुपयाचा असेल तर तुम्हाला 29,82,941 रुपये एवढे होम लोन मंजूर होऊ शकते.
जर तुमचा मंथली नेट इन्कम 50,000 एवढा असेल तर तुम्हाला 37,28,676 रुपये होम लोन मंजूर होऊ शकते. इथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे की, बँकेच्या माध्यमातून तुमची इन हॅन्ड सॅलरी गृहीत धरली जात नाही.
कारण की तुमच्या इन हॅन्ड सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी, मेडिकल अलाउंस, लीव ट्रेवल अलाउंस (LTA), हाउस रेंट अलाउंस (HRA) आणि दूसरे अलाउंसेज समाविष्ट असतात. बँक तुमची इन हॅन्ड सॅलरी मोजताना हे भत्ते गृहीत धरत नाही.