Home Loan News : तुम्हीही नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची राहणार आहे. विशेषतः जे लोक गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असतील त्यांच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. कारण की, आज आपण सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या टॉप 5 बँकांची माहिती जाणून घेणार आहोत.
यामुळे तुमचे नवीन घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. ज्या बँका कमी इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत त्या बँकांकडून कर्ज घेऊन तुम्ही तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहात.
खरतर, अलीकडे सर्वच बँक आपल्या ग्राहकांना कमी इंटरेस्ट रेट वर कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय यांसारख्या प्रमुख बँकांचा देखील समावेश आहे.
देशातील प्रमुख बँका आता परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर होम लोन उपलब्ध करून देत असल्याने अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता आपण कोणत्या बँका कमी इंटरेस्ट रेट वर कर्ज उपलब्ध करून देत आहे त्याची माहिती पाहणार आहोत.
परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर होम लोन देणाऱ्या बँका
HDFC : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना 9.4 ते 9.95% या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.
एसबीआय : स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. ही बँक 9.15 ते 9.75% व्याजदरात गृह कर्ज पुरवत आहे.
आयसीआयसीआय बँक : देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणून या बँकेची ओळख आहे. ही बँक 9.40% ते 10.05% या इंटरेस्ट रेट वर गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे.
कोटक महिंद्रा बँक : ही बँक पगारदार लोकांना 8.7% आणि सेल्फ एम्प्लॉइड लोकांना ८.७५% या इंटरेस्ट रेट ने गृह कर्ज उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर आली आहे.
पंजाब नॅशनल बँक : पंजाब नॅशनल बँक 9.4% ते 11.6% या व्याजदरात सर्वसामान्यांना गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.