सर्वात कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या टॉप 10 बँका कोणत्या ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan : तुम्हीही नवीन आर्थिक वर्षात नवीन घर खरेदी करणार आहात का ? हो मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घर खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारत आहे.

होम लोन घेऊन घर खरेदी करणे काही अंशी फायदेशीर देखील ठरते. दिवसेंदिवस वाढत असलेले शहरीकरण, औद्योगिकीकरण, नागरिकीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे घरांच्या किमती सातत्याने वाढत आहे. भविष्यातही घरांच्या किमती अशाच तेजीत राहतील असा अंदाज आहे.

यामुळे होम लोन घेऊन का होईना पण घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे, असा मानस अनेकांचा आहे. दरम्यान आज आपण देशातील अशा दहा बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन ऑफर करत आहेत.

सर्वात कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या टॉप 10 बँका

युनियन बँक ऑफ इंडिया : सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन देते. ही बँक होम लोन साठी सर्वात कमी व्याजदर वसूल करत असल्याचा दावा केला जात आहे. या बँकेकडून 8.35% या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

बँक ऑफ बडोदा : पब्लिक सेक्टर मधील ही आणखी एक मोठी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.40% व्याजदरात होम लोन पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब नॅशनल बँक : या बँकेकडूनही आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या रेटमध्ये गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर बँकेकडून आपल्या ग्राहकांना 8.40% या किमान व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

इंडियन बँक : पब्लिक सेक्टर मधील ही बँक आपल्या ग्राहकांकडून होम लोनसाठी किमान 8.40% एवढे व्याजदर आकारात आहे. बँकेचा हा किमान व्याजदर असून ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच या व्याजदरात कर्ज मिळते.

बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेप्रमाणेच बँक ऑफ इंडिया देखील गृह कर्जासाठी 8.40 टक्के एवढे किमान व्याजदर आकारत आहे.

आयडीबीआय बँक : मिळालेल्या माहितीनुसार, आयडीबीआय बँक आपल्या ग्राहकांकडून गृह कर्जासाठी 8.40% एवढे किमान व्याजदर वसूल करते. जर एखाद्या ग्राहकाला या व्याजदरात 75 लाखाचे कर्ज 20 वर्षाच्या कालावधीसाठी मिळाले तर सदर ग्राहकाला 64 हजार दोनशे रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

कॅनडा बँक : कॅनडा बँक आपल्या ग्राहकांना गृह कर्ज ऑफर करत आहे. गृह कर्जासाठी ही बँक 8.50% एवढे किमान व्याजदर वसूल करते.

कोटक महिंद्रा बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. सदर बँकेकडून 8.70% एवढ्या किमान व्याजदरात गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

आयसीआयसीआय बँक : प्रायव्हेट सेक्टर मधली ही एक मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना नऊ टक्के या किमान व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते. बँकेचा हा किमान व्याजदर असून याचा लाभ फक्त 800 च्या आसपास सिबिल स्कोर असलेल्या लोकांनाच मिळतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआय ही पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 9.15% या किमान व्याजदरात गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. 

Leave a Comment