Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे आता घर खरेदीसाठी होम लोनचा आधार घेतला जात आहे. होम लोन अर्थातच गृह कर्ज घेऊन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केले जात आहे.
जर तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरे तर बँका गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना स्वस्त व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
विशेषतः महिलांसाठी देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान आज आपण देशातील अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या बँका कमी व्याजदरात महिलांना होम लोन ऑफर करत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अर्थातच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. ही बँक आपल्या महिला ग्राहकांना स्वस्त व्याजदरात होम लोन ऑफर करत आहे.
या बँकेच्या माध्यमातून महिलांना दिल्या जाणाऱ्या होम लोनमध्ये पाच बेसिस पॉईंटची सवलत ऑफर केली जात आहे. क्रेडिट स्कोरच्या आधारावर या बँकेकडून महिलांना 9.15 ते 10.15% व्याज दरात होम लोन ऑफर केले जात आहे.
एचडीएफसी बँक : एसबीआय पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे तर एचडीएफसी प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक महिलांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देते. बँकेच्या माध्यमातून स्वस्त व्याजदरात होम लोन ऑफर केले जात आहे.
एचडीएफसी बँक होम लोन साठी महिलांना पाच बेसिस पॉईंटची सवलत देत आहे. जर महिलांनी या बँकेकडून होम लोन घेतले तर त्यांच्याकडून 8.95% ते 9.85% दरम्यान व्याज आकारले जाते. क्रेडिट स्कोर चांगला असला तर व्याज कमी लागते.
कॅनरा बँक : ही बँक देखील महिला कर्जदारांसाठी स्वस्त व्याजदरात होम लोन ऑफर करत आहे. बँकेच्या माध्यमातून महिलांकरिता होम लोन साठी ५ बेसिस पॉइंट्सची सूट दिली जात आहे. कॅनरा बँकेकडून महिलांसाठी ८.८५% या सुरुवातीच्या व्याजदरात होम लोन ऑफर केले जात आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया : पब्लिक सेक्टर मधील युनियन बँक ऑफ इंडिया एक महत्त्वाची बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. या बारा बँकांमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचा देखील समावेश होतो. युनियन बँक ऑफ इंडिया महिलांना गृहकर्जाच्या व्याजदरात 5 बेस पॉइंट्सची अतिरिक्त सूट ऑफर करत असल्याची माहिती बँकेकडून प्राप्त झाली आहे.