पुढील 10 दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, कुठं पडणार थंडी अन कुठं पडणार अवकाळी पाऊस ? पंजाब डख म्हणताय….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh Havaman Andaj : गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झालेला आहे. राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्व पदावर आले असून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

जोरदार थंडीमुळे आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात त्यामुळे सर्वसामान्यांनी काळजी घ्यायची आहे. दरम्यान ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी आगामी दहा दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 

काय म्हणताय पंजाबराव डख

पंजाबरावांनी 4 फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्यातील हवामान कसे राहणार याबाबत मोठी माहिती दिली आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे पुढील दहा दिवस राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे.

म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता सर्वात जास्त पाहायला मिळू शकते. याशिवाय राज्यातील इतरही भागात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून अवकाळी पाऊस आता पुढील 10 दिवस राज्यातील कोणत्याच भागात हजेरी लावणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

उत्तर महाराष्ट्र : या विभागात 4 फेब्रुवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. येथील तापमान 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात 4 फेब्रुवारी पर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र : येथे देखील 4 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडे राहील आणि थंडीची लाट येईल असा अंदाज आहे. या विभागात कुठेच अवकाळी पाऊस बरसणार नाही.

मराठवाडा : मराठवाडा विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये 4 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे. या विभागातही थंडीचा जोर हळूहळू वाढणार अशी शक्यता आहे.

विदर्भ : विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यंतरी ढगाळ हवामान पाहायला मिळाले होते. एवढेच नाही तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला होता. आता मात्र विदर्भातील हवामान पूर्णपणे कोरडे झाले आहे.

पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात आता पुढील दहा दिवस अवकाळी पाऊस होणार नाही. तसेच या भागात थंडीचा जोर वाढणार असा अंदाज पंजाबरावांनी केला आहे.  

Leave a Comment