गुड न्युज ! सिडकोच्या ‘या’ घरांच्या किंमती कमी होणार, 6 लाख रुपये वाचणार, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cidco Home News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इंधनाचे वाढलेले दर, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढती मजुरी इत्यादी कारणांमुळे घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. वाढलेल्या किमती पाहता आता सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय.

विशेषतः मुंबई, पुणे, नवी मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. परिणामी आता सर्वसामान्य नागरिक सिडको आणि म्हाडाकडून उपलब्ध होणाऱ्या घरांची, लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात.

दरम्यान गेल्या वर्षी निघालेल्या सिडकोच्या लॉटरीबाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर २०२२ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर उलवे येथील बामण डोंगरी आणि खारकोपर रेल्वेस्थानकाजवळील 7849 घरांसाठी सोडत जाहीर केली होती.

यासाठी अर्ज मागवले गेले होते. दरम्यान या घरांसाठी 17 फेब्रुवारी 2023 मध्ये संगणकीय सोडत निघाली. मात्र या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या बजेट बाहेर होत्या.

परिणामी या घरांच्या किमती कमी झाल्या पाहिजे तर अशी मागणी सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केली जात होती. खरे तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या या घरांच्या किमती 35 लाख 30 हजार रुपये एवढी होती.

आता मात्र शासनाच्या माध्यमातून या घरांच्या किमती सहा लाख रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच आता हे घर सर्वसामान्यांना 27 लाख रुपयांत उपलब्ध होणार आहे.

खरेतर, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा ३ लाखांपर्यंत होती. त्यामुळे ३५ लाख किंमत असलेल्या घरासाठी पैसे उभे करण्यास अर्जदारांना अडचणी येत होत्या.

यामुळे घरांची किंमत कमी झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्यात आला. याच पाठपुरावाच्या पार्श्वभूमीवर आता सिडकोने घरांच्या किमती ६ लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या २.५ लाख रकमेच्या अनुदानासह आता या सदनिका २७ लाखांना उपलब्ध होणार असल्याचे सिडकोने यावेळी स्पष्ट केले आहे.

म्हणजेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अडीच लाख रुपयांच्या अनुदानासह या घरांच्या किमती आता सहा लाख रुपयांनी कमी झाल्या आहेत. यामुळे या लॉटरीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

Leave a Comment