हॉटेलमध्ये रूम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधार कार्ड आवश्यक असते का ? नवीन नियम सांगतो की…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hotel Room Booking : अविवाहित जोडपे किंवा नवविवाहित जोडपे आपला कॉलिटी टाईम स्पेंड करण्यासाठी कुठे बाहेर फिरायला जातात. अशावेळी हॉटेल मध्ये रूम बुक करावा लागतो. पण, अनेकदा असे आढळून आले आहे की हॉटेल मालक आधार कार्ड असल्याशिवाय रूम देत नाहीत.

हॉटेलमध्ये रूम बुकिंग साठी आधार कार्ड बंधनकारक असल्याचा दावा हॉटेल मालकांकडून केला जातो. जर आधार कार्ड दिले नाही तर हॉटेल मालक करून देत नाहीत. खरे तर आधार कार्ड एक अतिशय आवश्यक अन एक महत्त्वाचे शासकीय डॉक्युमेंट आहे.

आधार कार्डचा वापर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी होतो. शासकीय कामांमध्ये, बँकेशी निगडित कामांमध्ये आधार कार्डचा वापर होतो. बँक खात्यापासून ते विविध महत्त्वाच्या कागदपत्रांसमवेत आधार कार्ड लिंक असते.

आधार कार्ड पॅन कार्डला देखील लिंक असते. त्यामुळे अनेकजण आपले आधार कार्ड रूम बुक करताना देत नाहीत. आधार कार्डचा गैरवापर होण्याची त्यांना भीती असते.

पण बहुतांशी हॉटेल मालक आधार कार्ड नसेल तर रूम देत नाहीत. यामुळे मात्र अविवाहित जोडप्यांना किंवा नवविवाहित जोडप्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

अशा परिस्थितीत हॉटेलमध्ये रूम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधार कार्ड असणे आवश्यक असते का ? हा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण याच संदर्भात कायद्यात कोणत्या तरतुदी आहेत ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हॉटेलमध्ये रूम बुक करताना आधार कार्ड बंधनकारक आहे का ?

यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुट्टास्वामी प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार, आधार कार्ड हे बंधनकारक नाही. आधार कार्ड ऐवजी तुम्ही वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट असे पुरावे देखील हॉटेलमध्ये रूम बुकिंगसाठी देऊ शकता.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानुसार, हॉटेलमध्ये रूम बुकिंग करण्यासाठी आधार कार्ड ऐवजी इतर कोणत्याही वैध पुराव्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे जर हॉटेल मालक केवळ आधार कार्ड नसल्यामुळे रूम देणे टाळत असेल तर त्याच्या विरोधात तक्रार देखील केली जाऊ शकते.

आधार कार्डचा गैरवापर तथा वैयक्तिक डेटा चोरी जाऊ नये यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुट्टास्वामी प्रकरणात हा निकाल दिलेला आहे.

अर्थातच जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसमवेत किंवा पत्नी समवेत हॉटेलमध्ये गेलात अन रूम बुकिंग करताना तुम्हाला आधार कार्ड द्यायचे नसेल तर तुम्ही इतर वैध डॉक्युमेंट पुरावा म्हणून देऊ शकता. यामध्ये वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट यांसारख्या डॉक्युमेंटचा समावेश होतो.

Leave a Comment