नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा, याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतीच्या बऱ्याच कामांसाठी नकाशाची आवश्यकता असते, त्यासाठी शासनामार्फत ऑनलाईन नकाशा पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. नक्की कशाप्रकारे ऑनलाइन स्वरूपात जमिनीचा नकाशा पाहायचा याविषयी आपण माहिती येथे पाहणार आहोत.
शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?
तुमच्या शेतीचा नकाशा पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या mahabhunakasha.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
इथे तुम्हाला पहिल्यांदा राज्य, जिल्हा आणि गाव निवडायचे आहे. त्यानंतर ज्या गावांमध्ये तुमची शेतजमिन आहे ते गाव निवडायचे आहे.
तुमच्यासमोर गावाचा पूर्ण नकाशा प्रदर्शित केला जाईल, तुम्ही त्यामध्ये फक्त तुमच्याशी जमिनीचा नकाशा पाहू इच्छित असाल. तर तुम्हाला तिथे तुमच्या जमिनीचे Location टाकावी लागेल.
त्यासाठी तुम्ही तुमच्या सातबारा वरील गट क्रमांक किंवा खाते क्रमांक चा वापर करू शकता.
तुमच्या शेत जमिनीचा गट क्रमांक टाकल्यानंतर, तुमच्यासमोर तुमच्या शेतीचा पूर्ण नकाशा प्रदर्शित केला जाईल.
तुम्ही नकाशाच्या खाली दिलेल्या + आणि – या आयकॉन चा वापर करून नकाशाला झूम करू शकता. याच्या माध्यमातून तुम्ही नकाशाविषयी सविस्तर बाबी पाहू शकता.
तर मित्रांनो तुम्ही अशाप्रकारे तुमच्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहू शकता. हीच प्रक्रिया वापरून तुम्ही तुमच्या गावाचा किंवा जिल्ह्याचा नकाशा देखील पाहू शकता.
शेत जमिनीचे जे नकाशे ऑनलाईन दाखवले आहेत, ते 1880 पासून तयार कागदपत्रांच्या आधारे बनवले गेले आहेत.
मला आशा आहे मित्रांनो तुम्हाला ही महत्त्वाची अशी माहिती आवडली असेल, कशाप्रकारे तुम्ही शेत जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाईलवर पाहू शकता की माहिती तुमच्या नक्कीच कामाला आली असेल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.