एसटीने ‘या’ लोकांना विठुरायाच्या दर्शनासाठी मोफत प्रवास करता येणार ! वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : जय जय विठोबा रखुमाई…! असं म्हणतं देशभरातील वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारीने मार्गस्थ होत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. 29 जून रोजी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत.

सालाबादाप्रमाणे याहीवर्षी विठ्ठल नामाच्या जय घोषाने पंढरीनगरी दुमदुमणार आहे. दरम्यान, ज्या भाविकांना 29 जूनला आषाढी एकादशी निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी जायचे आहे अशा भाविक भक्तांसाठी एसटीच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. खरंतर दरवर्षी एसटी विविध मार्गावर ज्यादा गाड्या सुरु करते.

यावर्षी देखील एसटीच्या माध्यमातून पंढरपुरासाठी ज्यादा बसेस सुरू केल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातून पंढरपूरला जाण्यासाठी एसटी कडून जवळपास 250 ते 300 अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार आहेत.

अहमदनगरप्रमाणेच राज्यभरातील वेगवेगळ्या शहरातून वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी अतिरिक्त बसेस महामंडळाच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत. तसेच यंदा विठुरायाच्या दर्शनासाठी काही लोकांना एसटीने मोफत प्रवास करता येणार आहे. तसेच काहींना 50 टक्के सवलतीच्या दरात यंदा विठुरायाच्या दर्शनाला जाता येणार आहे.

कोणाला जाता येणार विनामूल्य?

ऑगस्ट 2022 मध्ये राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार राज्यातील 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. यामुळे यंदाच्या पंढरपूर वारीसाठी एसटीने जाणाऱ्या 75 वर्षांवरील भाविकांना मोफत प्रवास करता येणार आहे. यामुळे यावर्षी ज्येष्ठ नागरिकांना विठुरायाचे दर्शन मोफत करता येईल असं चित्र आहे. निश्चितच ज्येष्ठांसाठी हा निर्णय फायद्याचा राहणार आहे. दरम्यान, यंदा या निर्णयानंतर एसटीने वारीला जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील वाढणार असा अंदाज आहे.

महिलांना मिळणार 50 टक्के सवलत

मार्चमध्ये राज्य शासनाने महिलांना एसटीच्या प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत देण्याचा निर्णय घेतला. अर्थातच महिलांना आता अर्ध्या तिकिटात एसटीने प्रवास करता येणे शक्य बनले आहे. साहजिकच, महिलांना देखील यंदा एसटीने मात्र निम्मे खर्चात आषाढी वारी करता येणार आहे.

महिलांना देखील 50% तिकीट सवलतीच्या दरात यंदा वारी करता येणार आहे. एकंदरीत यावर्षी बसेसने वारीला जाणाऱ्या ज्येष्ठांना आणि महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यामुळे शासनाचा हा निर्णय खऱ्या अर्थाने यंदाच्या आषाढी वारीत सार्थक होईल असं मत आता व्यक्त होऊ लागले आहे. 

Leave a Comment