HRA Hike News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार एक मोठी भेट देणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की पुढील वर्षी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यासोबतच महाराष्ट्रासहित देशातील काही प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आयोजित केल्या जाणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने त्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना साधण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी देखील केंद्र सरकारकडून वेगवेगळे कौतुकास्पद निर्णय घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता वाढवण्यात आला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2023 पासून वाढवण्यात आला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये आता चार टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजे आता महागाई भत्ता 46 टक्के एवढा झाला आहे.
दरम्यान महागाई भत्ता वाढीनंतर आता घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए देखील वाढवला जाणार आहे. एच आर ए हा तीन टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल असे वृत्त समोर आले आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देखील दुपटीने वाढणार आहे.
केव्हा होणार निर्णय
हाती आलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा एचआरए ज्यावेळी महागाई भत्ता 50% क्रॉस करेल त्यावेळी वाढवला जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा आहे.
यामध्ये आता जानेवारी 2024 पासून चार टक्के वाढ होणार असे सांगितले जात आहे. म्हणजेच नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाणार आहे. अशा परिस्थितीत HRA देखील पुढील वर्षी सुधारित केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
किती वाढणार HRA
सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या त्यांच्या निवासस्थानावरून म्हणजेच वास्तव्याच्या ठिकाणानुसार एच आर ए दिला जात आहे. यामध्ये एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 27 टक्के, वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 9% एचआरए दिला जात आहे.
दरम्यान यामध्ये आता तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. X कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांचा HRA तीस टक्के, Y श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA वीस टक्के आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा एच आर ए दहा टक्के एवढा केला जाणार आहे.