Mahindra Bolero Pikup CNG : शेतकरी वर्ग म्हटला म्हणजे शेतीशी संबंधित अनेक प्रकारची कामे करण्यासाठी वाहनांची आवश्यकता भासते. यामध्ये जर आपण पाहिले तर ट्रॅक्टर हे असे यंत्र किंवा वाहन आहे की त्याचा उपयोग कुठल्याही पिकांसाठी शेतीची पूर्व मशागत करण्यापासून ते पिकांचे अंतर मशागत व पिकांची काढणी केल्यानंतर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त ट्रॅक्टर सारख्या वाहनाचा उपयोग इतर व्यवसायिक कामांसाठी देखील शेतकरी करतात.
ट्रॅक्टर नंतर शेतकऱ्यांमध्ये पसंतीचे वाहन येते ते म्हणजे पिकअप गाडी होय. पिकअपचा वापर शेतकरी कांदा किंवा फळबागांसारखा शेतीमाल मार्केट पर्यंत पोहोचवण्यासाठी करतातच.परंतु तर व्यावसायिक कामांसाठी वाहन भाड्याने देण्यासाठी पिकअप शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून देखील फायद्याची ठरते. तसेच लांबच्या बाजारपेठेमध्ये वेगात भाजीपाला पोहोचवायचा असेल तर पिकअप हे वाहन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरते. अशाप्रकारे नक्कीच महिंद्राची ही सीएनजी बोलेरो पिकअप शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे.
महिंद्रा बोलेरो पिकअप सीएनजीची वैशिष्ट्ये
महिंद्राची ही सीएनजी बोलेरो पिकअप 2523 सीसी क्षमतेच्या चार सिलेंडरसह असून तिचा एमएसआय 2500 सीएनजी, बीएस सहा इंजन दिले असून जे 67 एचपी पावरसह 178 एनएम टॉर्क जनरेट करते. विशेष म्हणजे महिंद्रा कंपनीने या बोलेरो पिकअपला 140 लिटर क्षमतेची डिझेल टाकी दिली असून 19 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देखील देण्यात आले आहे.
तसेच कंपनीच्या माध्यमातून बोलेरो पिकअपला 1190 किलो वजन उचलण्याची क्षमता देखील देण्यात आलेली असून या गाडीचे संपूर्ण इंजिन व बॉडीचे वजन जवळपास 1800 किलो इतके आहे. तसेच या गाडीचा वेग हा 80 किलोमीटर प्रतितास इतका आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
महिंद्रा बोलेरो सीएनजी पिकअपला कंपनीच्या माध्यमातून पावर स्टेरिंग देण्यात आलेली असून पाच फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर देण्यात आला आहे. तसेच कंपनीच्या माध्यमातून या गाडीला सिंगल प्लेट ड्राय क्लच दिला आहे.
तसेच ही पीक अप ड्रायव्हर सहपुढे एक सिटमध्ये उपलब्ध असून या गाडीला रिजिड लाईफ स्प्रिंग फ्रंट आणि रियल सस्पेन्शनसह तयार केले आहे. शेतकरी बंधू या गाडीला शेतीमाल वाहतुकीसाठी तसेच दूध व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसाय करीता देखील वापरू शकतात.
किती आहे या गाडीची किंमत?
महिंद्रा बोलेरो पिकअपची शोरूम किंमत ही नऊ लाख 3 हजार ते नऊ लाख दहा हजार रुपये निर्धारित करण्यात आलेली असून देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणचे आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स यामुळे काही बदल होऊ शकतो.