Mumbai-Ahmedabad Bullet Train : कधी धावणार मुंबई- अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन ? केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai-Ahmedabad Bullet Train :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू असून हा एक रेल्वेचा महत्त्वकांक्षी असा प्रकल्प आहे. तसेच मुंबई ते अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील पहिलाच बुलेट ट्रेन प्रकल्प आहे.

परंतु नेमकी या मार्गावर बुलेट ट्रेन कधी धावेल? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. या अनुषंगाने या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये एक मोठी अपडेट सध्या समोर आली असून भारताचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमांमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

काय म्हटले केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव?
याबाबत माहिती देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, बुलेट ट्रेन चे काम वेगाने सुरू असून मी काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाची माहिती घेतली. जगातील अनेक देशांमध्ये बुलेट ट्रेन सुरू होण्याकरिता वीस वर्षाचा कालावधी लागला.

मात्र भारतामध्ये मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आठ वर्षांमध्ये पूर्ण तयार होणार आहे. तसेच त्यांनी म्हटले की या ट्रेनचे काम सध्या वेगात सुरू असून साधारणपणे 2026 मध्ये मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होऊ शकते. सुरत ते बिलीमोरा या दरम्यान ही बुलेट ट्रेन धावेल. हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून जपानच्या मदतीने या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे.

कसा आहे हा बुलेट ट्रेन प्रकल्प?
मुंबई ते अहमदाबाद या दोन महत्त्वपूर्ण शहरांमधील पाचशे आठ किमी लांबीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प असून यासाठी तब्बल एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान 12 स्टेशन्स असून महाराष्ट्रामध्ये या ट्रेनची चार स्थानके आहेत.

यातील तीन स्थानके उन्नत प्रकारातील आहेत. जर आपण या प्रकल्पाच्या खर्चाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या प्रकल्पाकरिता जपान सरकारने कर्ज दिले असून 50 टक्के खर्चाचा वाटा केंद्र सरकारचा आहे तर 25% वाटा महाराष्ट्र व 25 टक्के गुजरात सरकारचा आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन 14 सप्टेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी 350 किलोमीटर इतका असणार आहे व ही भारतातील सर्वात वेगात धावणारी ट्रेन असणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या 508 किलोमीटर अंतरामध्ये ही बुलेट ट्रेन धावणार आहे.

या ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास तसेच बिझनेस, इकॉनोमिक क्लास असणार आहे. त्यामुळे मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांमधील अंतर दोन तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गावर 24 नदी पूल, 28 स्टील ब्रिज, सात बोगदे असणार असून सात किलोमीटर लांबीचा समुद्राखाली देखील बोगदा असणार आहे.

Leave a Comment