Income Tax Rule : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती विक्रमी वाढत आहेत. हा पिवळा धातू आता गरीब लोकांच्या आवाक्याबाहेरचा बनला आहे. दिवाळीच्या काळात सोन्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आणि आता लग्नसराईच्या काळात यामध्ये आणखी तेजी येणार असा दावा केला जात आहे.
सोन्याच्या किंमती आता आपल्या ऑल टाइम हायच्या जवळ पोहोचलेल्या आहेत. विशेष म्हणजे गोल्डच्या किंमती ऑल टाइम हाय पेक्षाही अधिक होणार असा दावा देखील तज्ञांनी केला आहे.
यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या तेजीचा चांगलाच फायदा झाला आहे. विशेष म्हणजे आगामी काळात देखील सोन्यामधील गुंतवणूक शाश्वत परतावा देणार असे मत व्यक्त होत आहे.
यामुळे या पिवळ्या धातूत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे. अशा या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक घरात किती सोने ठेवू शकतात ? याबाबत भारतीय आयकर विभागाचा नियम काय म्हणतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
घरात किती सोन ठेवल जाऊ शकत?
खरे तर, आता गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी डिजिटल गोल्ड आणि गोल्ड बोन्ड देखील बाजारात आले आहेत. पण, भारतीय अजूनही घरात सोने ठेवण्यालाच पसंती दाखवत आहेत. अशा स्थितीत घरात सोने ठेवण्याबाबत भारतीय आयकर विभागाचे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, सोने किंवा त्याचे दागिने खरेदी केले की त्याचे बिल घ्यावे आणि ते बिल नेहमी सुरक्षित ठेवावे. तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, परंतु तुम्हाला त्याचा स्रोत देखील घोषित करावा लागेल.
तसेच जर पुराव्यात छेडछाड किंवा तफावत आढळली तर तुमचे सोने जप्त केले जाऊ शकते. आपल्या देशात कोण किती सोने ठेवू शकते ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरे तर, याबाबत सीबीडीटीने काही महत्वाचे नियम तयार केले आहेत.
या नियमांचे भारतातील सर्व नागरिकांना पालन करावे लागते. या नियमांमध्ये कोण किती सोन ठेवू शकतो याबाबत तरतूद आहे. तसेच तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त सोनेही ठेवू शकता, पण हे सोने तुमच्याकडे कुठून आले याचे उत्तर तुमच्याकडे असले पाहिजे.
नियमांमध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्याच्या घरात अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि नियमांमध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी सोने असेल किंवा मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल पण ते सोने कुठून खरेदी केले आहे त्याबाबतचे योग्य कागदपत्रे असतील तर ते घरात सापडलेले सोन तसेच सोन्याचे दागिने जप्त करू शकत नाहीत.
दरम्यान सोन्याबाबत तयार करण्यात आलेल्या या नियमानुसार एक विवाहित महिला 500 ग्रॅम सोने स्वत:जवळ ठेवू शकते. तसेच अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने स्वत:जवळ ठेवू शकते आणि एक माणूस 100 ग्राम पर्यंतचे सोने आपल्या सोबत ठेवू शकतात.