Income Tax Rule : जर तुमचेही बँक अकाउंट असेल आणि तुम्हीही तुमच्या बँक अकाउंट मधून कॅश काढण्याच्या तयारीत असाल तर थोडे थांबा ! हा लेख एकदा वाचा आणि मग बँक खात्यातून पैसे काढण्याचे नियोजन करा. खरे तर आपल्यापैकी अनेकांना नेहमीच रोकड पैशांची गरज भासत असते.
दैनंदिन कामांसाठी, संसारासाठी किंवा इतर काही महत्त्वाच्या कामांसाठी रोख पैशाची गरज पडत असते. रोकड पैशांची गरज लागली की आपण एटीएममध्ये जातो किंवा बँकेत जातो आणि पैसे काढत असतो.
पण एखाद्या ग्राहकाने आयकर विभागाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम बँक खात्यातून काढली तर अशा ग्राहकाला टॅक्स द्यावा लागतो. कदाचित तुम्हाला आयकर विभागाच्या या नियमाची माहिती नसेल मात्र आयकर विभागाने हा नियम सर्वांसाठी लागू आहे.
दरम्यान आता आपण बँक खातेधारक एका वर्षात किती रक्कम विना टॅक्स देता काढू शकतात, याबाबत आयकर विभागाचा नियम काय आहे ? याविषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक खात्यातून एका वर्षात किती पैसे काढता येतात
अनेकांना असे वाटते की, ते त्यांच्या बँक खात्यातून त्यांना हवे तितके पैसे विनामूल्य काढू शकतात. परंतु, आयकर कायद्याच्या कलम 194N अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्याला TDS भरावा लागतो.
मात्र, हा नियम सर्वच बँक ग्राहकांना लागू होत नाही. हा नियम जे लोक इन्कम टॅक्स भरत नाहीत अशा लोकांसाठी लागू होतो.
ज्यांनी ज्यांनी सलग 3 वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरलेला नाही अशा लोकांना एका वर्षात फक्त वीस लाखांपर्यंतची रक्कम विना टॅक्स काढता येऊ शकते. यापेक्षा जास्त रक्कम संबंधित ग्राहकांनी काढल्यास त्यांना टीडीएस भरावा लागतो.
ITR असलेल्या लोकांना एका वर्षात एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम विना टॅक्स काढता येते. मात्र आयटीआय भरणाऱ्या लोकांनी एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम एका वर्षात काढली तर त्यांना देखील टीडीएस भरावा लागू शकतो.
किती टीडीएस भरावा लागतो
आयकर विभागाच्या या नियमानुसार, जे लोक ITR भरतात अशा लोकांनी जर बँक खात्यातून 1 कोटींहून अधिक रक्कम काढली तर त्यांना 2 टक्के दराने TDS द्यावा लागतो.
तसेच जे व्यक्ती ITR भरत नाहीत अशा लोकांनी जर 20 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढले तर त्यांना जेवढी रक्कम काढणार आहेत त्यावर 2 टक्के TDS भरावा लागतो. मात्र जर अशा लोकांनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे काढले तर त्यांना 5 टक्के एवढा TDS भरावा लागतो.