India Divorce Rule : आपल्या देशात लग्न हा एक संस्कार समजला जातो. एकदा एखाद्या सोबत रेशीमगाठ बांधली गेली की ती सात जन्मांसाठी बांधली जाते, अशी मानता आहे. मात्र अलीकडे आपल्या भारतीय संस्कृतीत परदेशी संस्कृतीचा मोठा पगडा पाहायला मिळत आहे.
वेस्टर्न कल्चर पूर्णपणे भारतीय लोकांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे लाइफस्टाईल तर बदललीच आहे शिवाय भारतीय संस्कृतीमधील विचार देखील आता पूर्णपणे बदलले आहेत. पूर्वी सनातन हिंदू धर्मात घटस्फोट घेणे हे पाप समजले जात असे.
आता मात्र देशात प्रत्येकच समाजात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान आपल्या देशात घटस्फोट घेण्याची प्रक्रिया कशी असते असा देखील सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
अशा परिस्थितीत आज आपण भारतात घटस्फोट घेण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते याविषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
घटस्फोट घेण्याची प्रक्रिया कशी असते?
घटस्फोट घेणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. यामुळे विवाहितच जोडप्यांना घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करावी लागते. दरम्यान न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर माननीय न्यायालयाच्या माध्यमातून दोन्ही पक्षांना आपापले मत व्यक्त करण्यास सांगितले जाते.
दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर माननीय न्यायालय मग दोन्ही पक्षांना पुन्हा समझोता करण्यासाठी विवाह टिकवून ठेवण्यासाठी वेळ देते.
मात्र यानंतर देखील जर पती आणि पत्नी दोघेही घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम असतील तर न्यायालयाच्या माध्यमातून घटस्फोट दिला जातो. घटस्फोटाच्या याचिकेवर मग न्यायालयाच्या माध्यमातून सुनावणी घेतली जाते आणि घटस्फोटाला मान्यता दिली जाते.
घटस्फोट मिळवण्याचे मार्ग
परस्पर संमती : जे जोडपं परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ इच्छित असेल अशा जोडप्यांना कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी संयुक्त याचिका दाखल करावी लागते. मात्र यासाठी त्यांना न्यायालयात विशिष्ट कारणांसाठी घटस्फोट घेत असल्याचे पुरावे द्यावे लागतील.
विवादित घटस्फोट : जेव्हा एक पक्ष घटस्फोट घेऊ इच्छित असेल आणि दुसरा पक्ष घटस्फोट घेऊ इच्छित नसेल तेव्हा जो घटस्फोट होतो त्याला विवादित घटस्फोट म्हणतात. अशा प्रकरणांमध्ये जोडप्यापैकी ज्या व्यक्तीला घटस्फोट घ्यायचा आहे अशा व्यक्तीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाच्या कारणासह याचिका दाखल करणे आवश्यक आहे.
घटस्फोटाची कारणे
व्यभिचार, क्रूरता, त्याग, दुसरा धर्म बदलणे, मानसिक आजार आणि असाध्य रोग यांसारख्या असंख्य कारणांनी घटस्फोट होतो. मात्र घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीला ही कारणे न्यायालयाला पटवून द्यावे लागतील. यासाठी सदर व्यक्तीला आवश्यक पुरावे द्यावे लागतील.