भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, 24 तासाचा प्रवास आता फक्त 12 तासात, केव्हा सुरु होणार ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Longest Highway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये भारतमाला परियोजनेअंतर्गत अनेक मोठ-मोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या महाराष्ट्रातही अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत. मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित होत आहे. हा मार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून आत्तापर्यंत या मार्गाचा 625 किलोमीटरचे तीन टप्पे सुरू झाले आहेत.

या मार्गाचा चौथा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा जुलै 2024 मध्ये सुरु होईल असा अंदाज आहे. तसेच नागपूर ते गोवा दरम्यान 802 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग विकसित केला जाणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादन देखील सुरू झाले आहे.

याशिवाय सध्या मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या महामार्गाचे देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान याच महामार्ग संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा महामार्ग केव्हा सुरू होऊ शकतो याबाबत मीडिया रिपोर्ट मध्ये मोठा दावा करण्यात आला आहे.

केव्हा सुरू होणार 1350 किलोमीटर लांबीचा मार्ग?

मुंबई ते दिल्ली दरम्यान 1350 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जात आहे. विशेष म्हणजे हा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. हा प्रवेश नियंत्रित महामार्ग देशाच्या एकात्मिक विकासात मोलाचे योगदान देणार आहे.

या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे गेल्यावर्षी उद्घाटन देखील झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या 246 किमी लांबीच्या दिल्ली-दौसा-लालसोट ब्लॉकचे उद्घाटन केले होते. या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे.

या एक्सप्रेस वे चे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास वेगवान होणार आहे. सध्या मुंबई ते दिल्ली असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 24 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. मात्र जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास बारा तासांवर येणार आहे.

हा एक्सप्रेसवे देशातील प्रमुख शहरे जसे की, कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत यांना जोडणार आहे. या संपूर्ण द्रुतगती मार्गावर 30 लेनचे टोलनाके उभारले जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या पासिंगसाठी लागणारा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होणार आहे.

या द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी कार पार्किंग, इंधन पंप, उपाहारगृहे, सेवा क्षेत्र, स्वच्छतागृहे, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आदींची व्यवस्था करण्यात येत आहे. 2.5 किमीचा वन्यजीव क्रॉसिंग असलेला हा भारतातील पहिला एक्सप्रेस वे असेल.या प्रकल्पाची 52 पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

हा द्रुतगती मार्ग 93 PM गति शक्ती आर्थिक नोड्स, 13 बंदरे, आठ प्रमुख विमानतळ आणि 8 मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. हा मार्ग 8 लेनपर्यंत विस्तारित केला जाऊ शकतो. हा मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांना जोडणार आहे.

हा एक्स्प्रेस वे गुडगावपासून सुरू होऊन राजस्थानमधील जयपूर आणि सवाई माधोपूर, मध्य प्रदेशातील रतलाम आणि गुजरातमधील वडोदरामार्गे मुंबईला पोहोचेल. या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 2024 अखेरपर्यंत हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल अशी आशा आहे.

Leave a Comment