धक्कादायक ! देशातील बँक कर्मचारी तब्बल 13 दिवसांसाठी संपावर जाणार, केव्हा सूरु होणार संप? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Bank Employee Strike 2023 : देशातील बँक ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार देशातील बँक कर्मचारी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात तब्बल 13 दिवसांच्या काळासाठी संपावर जाणार आहे.

यामुळे बँक ग्राहकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच संपाचे वेळापत्रक पाहून बँक ग्राहकांना आपल्या बँकिंग कामाचे नियोजन या ठिकाणी करावे लागणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात जर नागरिकांना काही महत्त्वाची बँकिंग कामे करायची असतील तर त्यांनी संपाच्या आधी किंवा संपानंतर त्यांची कामे करावीत असा सल्ला दिला जात आहे.

जर खूपच अत्यावश्यक बँकिंग कामे असतील तर नागरिकांनी संप सुरू होण्यापूर्वीच ही कामे करून घेणे त्यांच्यासाठी हितकारक ठरणार आहे. इंडियन बँक एम्प्लॉईज युनियनने देशातील बँकिंग कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत माहिती दिली आहे. या संघटनेने देशातील विविध बँकेतील कर्मचारी 13 दिवसांसाठी संपावर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तथापि वेगवेगळ्या बँकेतील कर्मचारी वेगवेगळ्या तारखांना संपावर जाणार आहेत. यामुळे कोणत्या बँकेतील कर्मचारी कोणत्या कालावधीत संपावर जाणार याबाबत माहिती असणे बँक ग्राहकांना गरजेचे आहे. हेच कारण आहे की आज आपण कोणत्या बँकेतील कर्मचारी केव्हा संपावर जाणार आहेत याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Bank Employee केव्हा जाणार संपावर 

या संपाच्या पार्श्वभूमीवर इंडियन बँक एम्प्लॉईज युनियनने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत बँक कर्मचारी कोणकोणत्या तारखांना संपावर जाणार आहेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सदर अधिसूचनेनुसार 4 डिसेंबरला PNB, SBI आणि पंजाब अँड सिंध या बँकेतील अखिल भारतीय कर्मचारी संप पुकारणार आहेत. पाच डिसेंबरला बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया या बँकेतील कर्मचारी संप पुकारतील.

6 डिसेंबरला कॅनडा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपाचे हत्यार उपसणार आहेत. 7 डिसेंबरला इंडियन बँक आणि युको बँकेतील कर्मचारी संपावर जातील.

आठ डिसेंबरला युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. 11 डिसेंबरला देशातील सर्व खाजगी बँकेतील कर्मचारी संपावर जाणार अशी माहिती अधिसूचनेतुन समोर आली आहे.

जानेवारी महिन्यातही संप सूरु राहणार

संघटनेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जानेवारी महिन्यात वेगवेगळ्या राज्यातील कर्मचारी वेगवेगळ्या तारखांना संपावर जाणार आहेत. यात २ जानेवारीला तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमधील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार असे सांगितले जात आहे.

३ जानेवारीला गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीवमधील सर्व बँकांमधील कर्मचारीसंपावर जाणार आहेत. ४ जानेवारीला राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.

५ जानेवारीला दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश मधील बँक कर्मचारी संपावर जातील. ६ जानेवारीला पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

बँक कर्मचाऱ्यांचे संप पुकारण्याचे कारण 

मिळालेल्या माहितीनुसार बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात यासाठी या संपाची घोषणा केली आहे. बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात स्टाफची नियुक्ती करणे, कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग बंद करणे.

आउटसोर्सिंगशी संबंधित सेटलमेंटमधील तरतुदी आणि त्याचे उल्लंघन थांबवणे या तीन महत्त्वाच्या आणि गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

Leave a Comment