रेल्वेने प्रवास करतांना ‘या’ वस्तू सोबत बाळगल्यास 3 वर्षांची शिक्षा होणार ! Railway चे हे नियम तुम्हाला माहितच असायला हवेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railway Journey : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करण्याला विशेष प्राधान्य दाखवले जाते.

याशिवाय आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे देशातील कोणत्याही भागात जर जायचे असेल तर रेल्वेने सहजतेने पोहोचता येत आहे.

दरम्यान जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की रेल्वेने प्रवास करताना काही नियमांचे विशेष पालन करावे लागते.

रेल्वेने प्रवास करताना काही वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जर या प्रतिबंधित वस्तू एखाद्या प्रवाशाने सोबत बाळगल्या तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा त्याला तुरुंगात देखील पाठवले जाऊ शकते.

दरम्यान आता आपण रेल्वेने प्रवास करताना कोणत्या गोष्टी घेऊन जाण्यास मनाई आहे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रेल्वेने प्रवास करताना प्रवाशी कोणत्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाहीत?

मिळालेल्या माहितीनुसार भारतात रेल्वेने प्रवास करताना स्टोव्ह, गॅस सिलिंडर, आग लागणाऱ्या वस्तू, फटाके, ऍसिड, सिगारेट ग्रीस, दारू किंवा इतर मादक पदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे पदार्थ सोबत बाळगल्यास रेल्वेने प्रवास करता येणार नाही.

एवढेच नाही तर दारू पिऊन रेल्वेचा प्रवास करता येत नाही. रेल्वेने प्रवास करताना सुकलेला नारळ देखील घेऊन जाता येत नाही. सुकलेला नारळाचा वरचा भाग हा ज्वलनशील मानला जातो यामुळे सुकलेला नारळ रेल्वे प्रवासादरम्यान सोबत बाळगता येत नाही.

जर एखाद्याने या नियमांचे पालन केले नाही आणि प्रतिबंधित वस्तू सोबत बाळगल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. सदर नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर एक हजार रुपये दंड किंवा तीन वर्षांची शिक्षा अथवा दंड आणि कारावास अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

यामुळे जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर या नियमांचे तुम्हाला पालन करावे लागणार आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते आणि यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता.

Leave a Comment