Indian Railway News : नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, लांबच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. त्यामध्ये रेल्वेने सर्वाधिक प्रवास केला जातो. बसपेक्षा रेल्वेचा प्रवास अधिक गतीमान असल्याने रेल्वेच्या प्रवासाला नेहमीच पसंती दिली जाते.
विशेष बाब अशी की, भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सर्वाधिक लांबीचे पाचवे नेटवर्क आहे. याचाच अर्थ भारतीय रेल्वे कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. रेल्वेने देशातील कोणत्याही शहरात सहजतेने प्रवास करता येत आहे. हेच कारण आहे की, भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
या लाखों प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांची किरकोळ कोंडी दूर करण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. दरम्यान आज आपण रेल्वेच्या अशाच एका नियमाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरतर कधी-कधी लहान मुलांनाही प्रवासादरम्यान सोबत न्यावे लागते. अशा परिस्थितीत अनेकांचा असा प्रश्न असतो की, रेल्वेने प्रवास करताना लहान मुलांचे देखील तिकीट काढावे लागते का? यामुळे आज आपण पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना रेल्वेमध्ये प्रवास करताना तिकीट काढावे लागते का याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वास्तविक, अलीकडे सोशल मीडियामध्ये एक न्यूज वेगाने व्हायरल होत होती. यामध्ये असे नमूद करण्यात आले होते की, 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करणे अनिवार्य राहणार आहे.
म्हणजेच पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देखील रेल्वेमध्ये प्रवास करताना तिकीट काढावे लागणार असे या बातमीमध्ये सांगितले जात होते. मात्र, रेल्वेने असा काही नियम तयार केलेला नाही. यामुळे जुन्या नियमांनुसार रेल्वे प्रवासी प्रवासादरम्यान आपल्या लहान मुलाला पूर्वीप्रमाणेच ट्रेनमध्ये विना तिकीट घेऊन जाऊ शकता.
लहान मुलाच्या रेल्वे तिकीटाबाबत काय आहे नियम?
जर भारतीय रेल्वे मध्ये रेल्वे प्रवासी ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासोबत ट्रेनमध्ये प्रवास करत असतील तर त्यांना त्यांच्यासाठी बर्थ म्हणजे सीट बुक करण्याची गरज नाही. म्हणजेच तिकीट काढण्याची गरज नाहीये.
रेल्वे प्रवासी पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना आपल्यासोबत विना तिकीट घेऊन जाऊ शकता. तथापि, जर रेल्वे प्रवाशांना आपल्या मुलाची सोय लक्षात घेऊन मुलासाठी स्वतंत्र तिकीट आणि बर्थ बुक करायचा असेल तर प्रवाशी ते कोणत्याही निर्बंधाशिवाय करू शकता.
पण लहान मुलांसाठी तिकीट आणि बर्थ बुक करण्यासाठी एका व्यक्तीचे संपूर्ण भाडे द्यावे लागणार आहे. याबाबत सहा मार्च 2020 रोजी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून एक सर्क्युलर काढण्यात आले असून या सर्क्युलरमध्ये या नियमाचा उल्लेख करण्यात आला आहे.