Indian Railway Rule : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक कामाची बातमी आहे. खरे तर देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणार आहे.
शिवाय रेल्वेचे नेटवर्कही देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे प्रवासासाठी रेल्वेला विशेष पसंती मिळते.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, बसमध्ये प्रवास करताना पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना विना तिकीट प्रवास करता येतो.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून रेल्वेमध्ये असा काही नियम आहे का, रेल्वे प्रवासात जर सोबत पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेले मुलं असतील तर त्यांचे तिकीट काढावे लागू शकते का असा प्रश्न उपस्थित केला जातो का? दरम्यान याच संदर्भात भारतीय रेल्वेने मोठी माहिती दिली आहे.
भारतीय रेल्वेने रेल्वेच्या नियमानुसार पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना तिकीट काढावे लागते की नाही? याबाबत सोशल मीडिया वरून महत्त्वाची माहिती दिली आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने अनेक नियम तयार केले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा अनेकजण लहान मुलेही बरोबर नेत असतात.
विशेषतः सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये लहान मुले देखील प्रवासात सोबत असतात. दरम्यान लहान मुलांना रेल्वे प्रवासात कोणत्याच तिकीट काढावे लागत नाही. याचाच अर्थ तिकीट काढलेले नसले तरी देखील लहान मुलांना प्रवास करता येतो.
पण जर आपल्या सोबत असलेल्या लहानग्यांचा प्रवास आरामदायी व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा यासाठी तुम्ही त्यांचे स्वतंत्र तिकीट देखील काढू शकणार आहात.
पण लहान मुलांचे तिकीट असले तरी देखील त्यांना पूर्ण भाडे द्यावे लागणार आहे. म्हणजे इतर प्रवाशांना जेवढे भाडे लागणार तेवढेच भाडे लहान मुलांना देखील लागणार आहे.
पण जर तुम्हाला त्यांच्यासाठी तिकीट बूक करायची नसेल तर तुम्ही त्यांना तुमच्या बरोबर मोफत सुद्धा घेऊन जाऊ शकता.